MumbaiCoronaUpdate : SadNews : पोलीस दलातील दोन्हीही भाऊ एका पाठोपाठ एक गेले , एक ह्रदयविकाराने तर एक कोरोनाने

भावपूर्ण श्रद्धांजली!
कोरोनाशी झुंज देताना कोल्हापूर जिल्ह्यातील उदगांव (ता.शिरोळ) चे सुपुत्र व सध्या मुंबई येथील विक्रोळी पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक सचिन पाटील यांचा दुर्दैवी मृत्यू फारच दुःखदायक आहे.राज्य सरकार त्यांच्या परिवाराच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. pic.twitter.com/ld3yAU6caL— Satej (Bunty) D. Patil (@satejp) July 10, 2020
मुंबईतील विक्रोळी पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत असलेले पोलिस उपनिरीक्षक सचिन दिनकर पाटील (वय- 41) यांचं कोरोनामुळे निधन झालं आहे. सचिन पाटील हे मूळचे उदगावचे (ता. शिरोळ, जि.कोल्हापूर) रहिवासी होते. सचिन पाटील यांच्या निधनामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यावर शोककळा पसरली आहे. धक्कादायक म्हणजे सचिन पाटील आणि नितीन पाटील हे दोघे उपनिरीक्षक म्हणून पोलिस दलात भरती झाले होते. नाशिक इथे प्रशिक्षिण सुरु असताना नितीन पाटील यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. आता कोरोनामुळे सचिन पाटील यांचं कोरोनामुळे निधन झालं आहे. सचिन पाटील हे मुंबईतील विक्रोळी स्टेशनमध्ये पोलिस उपनिरीक्षक या पदावर कार्यरत होते. सचिन पाटील यांना श्वसनाचा त्रास होऊ लागला. नंतर गेल्या चार दिवसांपासून ताप होता. त्यांना ठाणे येथील गुरुनानक रुग्णालायात दाखल करण्यात आलं होतं. सेवन हिल्स रुग्णालयात त्यांच्या प्लाझ्मा थेरपी करण्यात येणार होती. त्यामुळे त्यांनी गुरुवारी सेवन हिल्स रुग्णालयात हलवण्यात आलं होतं. मात्र, प्लाझ्मा थेरपी करण्याआधीच सचिन पाटील यांनी प्राणज्योत मालवली. दोन्ही पोलीस उपनिरीक्षक भावांच्या मृत्यूने पाटील कुटुंबींयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.