मराठा आरक्षणाची सुनावणी घटनापीठाकडे नेण्याची गरंज नाही- राजेंद्र दाते पाटील

औरंगाबाद – उच्चन्यायालयात मराठा आरक्षणा संदर्भात निकाल लागल्या नंतर या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात घटनापीठापुढे सुनावणी घेतल्यास आणखी प्रश्न उभे राहतील त्यामुळे आपला विनोद पाटलांच्या याचिकेला विरोध असल्याची माहिती हस्तक्षेप याचिका कर्ते राजेंद्र दाते पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
राजेंद्र दाते पाटील व विनोद पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयात आदित्य विमल शास्री यांनी आरक्षणाला दिलेल्या आव्हानाच्या विरोधात हस्तक्षेप याचिका दाखल केलेल्या आहेत. केवळ आरक्षणाचा अंतरिम निकाल त्रिसदस्यीय पीठापुढे त्वरीत लागावा अशी मनिषा आपण बाळगून आहोत. उद्या घटनापीठापुढे सुनावणी होतांना आणखी काही प्रश्न उभे राहिले तर आरक्षणाचा प्रश्न लांबणीवर पडेल. तसे होऊ नये म्हणून आपण विनोद पाटील यांच्या म्हणण्याला आपण विरोध करत आहोत, असा खुलासा राजेंद्र दाते पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला.
दरम्यान या याचिकेची सुनावणी दि. ७ जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयात तीन न्यायमूर्तींच्या पीठासमोर झाली. वैद्यकीय पदव्युत्तर आणि दंतवैद्यकीय प्रवेशाबाबत १५ जुलै रोजी अंतरिम सुनावणी ठेवली आहे. या प्रकरणात राजेंद्र दाते पाटील यांच्या वतीने अॅड. अनिल गोलैगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली अॅड.सुधांशु चौधरी यांनी काम पाहिले. या वेळी पत्रकार परिषदेला किशोर चव्हाण, रविंद्र काळे, आदिंची उपस्थिती होती.