बोगस बियाणे प्रकरण : कृषीसहसंचालक हजर न झाल्यास बेड्या ठोकून हजर करा, खंडपीठाचे आदेश

औरंगाबाद – बोगस बियाणे प्रकरणात सुरु असलेल्या सुनावणी मधे विभागिय कृषी सहसंचालक टी.एस. जाधव यांनी येत्या १३जुलै रोजी हजर राहण्यास टाळाटाळ केल्यास त्यांना बेड्या ठोकून हजर करण्याचे आदेश जस्टीस टि.व्ही. नलावडे आणि श्रीकांत कुलकर्णी यांच्या खंडपीठाने दिले.
आजच्या(मंगळवार) सुनावणीत कृषीसहसंचालकांवर ताशेरे ओढतांना खंडपीठाने म्हटले की, शासनातर्फे शेतकर्यांसाठी काम करा बियाणे कांंकंपन्यांसाठी काम करायचे असल्यास शासकीय सेवेतुन मुक्त होऊन बियाणे उत्पादकांची चाकरी करा.
गेल्या ३०जून रोजी बोगस बियाणे प्रकरणात खंडपीठाने सुमोटो याचिका दाखल करुन घेतली होती.त्यावेळी बोगस बियाणे प्रकरणात दाखल झालेल्या तक्रारी आणि त्या बदल्यात दाखल झालेले गुन्हे याचा तपशील पोलिसांना सादर करण्यास सांगितला होता.त्यानुसार खंडपीठाच्या निर्दशनास आले की, बोगस बियाणे प्रकरणात एकूण अंदाजे ५०हजार तक्रारी संबंधित विभागाला प्राप्त झाल्यानंतर केवळ २३गुन्हे दाखल झाले आहेत याबाबतही खुलासा करण्याचे आदेश खंडपीठाने पोलिस आणि कृषी विभागाला दिले आहेत. तसेच महाबीज कंपनीने आज पर्यंत किती बीज वितरण केले.याचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. या सुमोटो याचिकेत अॅड.पी.पी.मोरे यांनी काम पाहिले आहे.