AurangabadCurrentNewsUpdate : १० ते १८ कडक जनता कर्फ्यू , नागरिकांना खबरदारीसाठी ४ दिवस , लोकप्रतिनिधींच्या बैठकीला खा . इम्तियाज जलील यांची मात्र दांडी …!!

औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यात वाढत असलेल्या रुग्णसंख्येमुळे १० ते १८ जुलै या कालावधीत जिल्हा प्रशासनाने जनता कर्फ्यू लावण्यात येणार असल्याचा निर्णय घोषित केला आहे. या कालावधीत उद्योग, व्यापारही बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जनतेने यास प्रतिसाद द्यावा, घरात बसून सहकार्य करावं, हा प्रशासनाचा कर्फ्यू नसून हा जनतेने स्वत:हून लागू केलेला जनता कर्फ्यू आहे, असे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी सांगितले . तसेच संचारबंदीच्या कालावधीत भाजीपाला आणि मेडिकल दुकानेही बंद राहणार असून या कर्फ्यूला आणखी चार दिवस असल्याने नागरिकांनी आपल्याला ज्या गोष्टी लागतात त्या घेऊन ठेवाव्यात म्हणजे संचारबंदीच्या दरम्यान बाहेर पडण्याची गरज पडणार नाही.
या बैठकीला विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी उदय चौधरी, पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद , ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्यासह खासदार भागवत कराड , आमदार हरिभाऊ बागडे , आमदार प्रदीप जैस्वाल , आमदार संजय शिरसाट, आमदार अतुल सावे , आमदार अंबादास दानवे , आ. सतीश चव्हाण यांच्यासह घाटीच्या डीन कानन येळीकर , उद्योजक राम भोगले , मुकुंद कुलकर्णी , मानसिंग पवार आदींची उपस्थिती होती. मात्र जिल्ह्याचे खासदार इम्तियाज जलील या बैठकीला गैरहजर होते. काल त्यांनी फेसबुक लाईव्हवरून शहर पुन्हा लॉकडाऊन करण्यापेक्षा लोकांना त्यांची जबाबदारी समजावून सांगा अशी भूमिका घेतली होती. आपल्या कोणत्याही सूचनांचा सकारात्मक विचार प्रशासन करीत नसल्याची संतप्त प्रतिक्रिया त्यांनी वेळोवेळी दिली आहे . त्यामुळेच त्यांनी या बैठकीला दांडी मारली कि काय ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
https://www.facebook.com/719366294805607/posts/3129265227149023/
या पार्श्वभूमीवर आज विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांच्या कार्यालयात शहरातील लोकप्रतिनिधींची बैठक झाली. या बैठकीत औरंगाबादमधील वाढत्या करोनाच्या प्रादुर्भावावर चर्चा करण्यात आली. त्यानंतर हा जिल्हाधिकारी चौधरी यांनी पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली. १० जुलै ते १८ जुलै दरम्यान शहर आणि वाळूज एमआयडीसी परिसरात हा जनता कर्फ्यू असेल. आठ दिवस आपण कडकडीत बंद पाळला तर कोरोनाचे रुग्ण रोखण्यात आपल्याला यश येईल. त्यामुळे जनतेचा हा स्वत:चा कर्फ्यू असल्याने घरीच थांबावे. विनाकारण घराबाहेर पडू नये, असं आवाहन चौधरी यांनी केले. तसेच वाळूज परिसरात उद्योग धंदे बंद आहेत. एमआयडीसी पूर्ण बंद आहे. शिवाय या परिसरातील लोकांनी स्वत:हून किराणा दुकानेही बंद ठेवली आहेत, असं सांगतानाच पोलीस, स्वयंसेवक आणि जिल्हा प्रशासन या जनता कर्फ्यूवर वॉच ठेवून असतील, असंही ते म्हणाले.