MaharashtraCoronaUpdate : राज्यात आज रुग्णवाढीचा उच्चांक , कोरोनाबाधितांच्या रुग्णसंख्येने पार केला दोन लाखांचा टप्पा

दिवसेंदिवस राज्यात दररोज कोरोना संसर्गा वाढतच असून आज दिवसभरात कोरोनाच्या आणखी २९५ बळींची नोंद झाली तर त्याचवेळी ७०७४ इतके कोरोनाचे नवीन रुग्ण आढळून आले आहेत. राज्यातील रुग्णसंख्येचा हा उच्चांक असून राज्यातील कोरोनाबाधितांच्या रुग्णसंख्येने आता दोन लाखांचा टप्पा पार केला आहे.
दरम्यान राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात आज ३३९५ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आजपर्यंत एकूण १,०८,०८२ करोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ५४.०२ % इतके झाले आहे. आज राज्यात ७०७४ नवीन रुग्णांचे निदान झाले तर आज २९५ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली. यापैकी १२४ मृत्यू मागील ४८ तासांमधील तर उर्वरित १७१ मृत्यू त्या आधीच्या कालावधीतील आहेत. सध्या राज्यातील मृत्यूदर ४.३३ % एवढा आहे. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १०,८०,९७५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २,००,०६४ (१८.५१ टक्के ) नमुने करोना पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५,९६,०३८ लोक होम क्वारंटाइनमध्ये आहेत तर ४१,५६६ लोक संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.
राज्यात करोनामृत्यूंचा आकडा वाढत चालला आहे. आज २९५ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून एकूण मृत्यूंची संख्या ८६७१ इतकी झाली असून हे मृत्यू मुंबई मनपा-६८, ठाणे मनपा-३, नवी मुंबई मनपा-३, कल्याण-डोंबिवली मनपा-५, उल्हासनगर मनपा-१, भिवंडी निजामपूर मनपा-२, पालघर-१, वसई-विरार मनपा-४, जळगाव-३, जळगाव मनपा-४, पुणे-१, पुणे मनपा-७, पिंपरी-चिंचवड मनपा-५, सोलापूर-४, सोलापूर मनपा-२, औरंगाबाद-३, औरंगाबाद मनपा-३, लातूर मनपा-१, अकोला-२, अकोला मनपा-१, यवतमाळ-१ या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील आहेत.