Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून कंपाउंडरला सूचना देत होता डॉक्टर, डायलेसिसच्या दरम्यान रुग्णांचा मृत्यू

Advertisements
Advertisements
Spread the love

रांची जवळच्या जामताडा येथे डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे एका किडनीच्या रुग्णाचा मृत्यू झाला आहे. या शहरात डायलेसिस सेंटर चालविण्याची जबाबदारी पीपीपी तत्वावर एका खासगी संस्थेला दिली आहे. मात्र इथे डॉक्टर घरीच बसून कंपाउंडरला सूचना देत होता. त्यामुळे डायलेसिस करताना एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सरकारने संजिवनी या संस्थेला डायलेसिस सेंटर चालविण्याची परवानगी दिली आहे. अशा सेंटरमध्ये डॉक्टरांची उपस्थिती आवश्यक असते. मात्र इथला डॉक्टर हा गेली तीन महिने सेंटरवरच आला नसल्याचे निदर्शनास आले आहे. तो घरीच बसून व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून कंपाउंडरला सूचना देत होता.

Advertisements

दरम्यान अशा सूचना देतानाच त्या पेशंटचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना  घडली आहे. डायलेसिस करताना पेशंटची तब्येत बिघडण्याची शक्यता असते. अशा वेळी डॉक्टरांची उपस्थिती आवश्य असते. ही घटना घडल्यानंतर प्रचंड चर्चा झाली. राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी त्याची दखल घेतली आहे. रतन साधू असं त्या रुग्णाचं नाव होतं. डायलेसिसच्या दरम्यान इंजेक्शन दिल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. इंजेक्शन देतांनाच रुग्ण बेशुद्ध झाला आणि नंतर त्याचा मत्यू झाल्याचं कंपाउंडरने म्हटलं आहे. या घटनेने सगळ्याच व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे. अशाच प्रकारच्या इतरही सेंटर्सवर डॉक्टर्स येतात किंवा नाही हे आता तपासलं जात आहे. त्यामुळे शंका निर्माण झाली असून रुग्णांमध्येही संशयाचं वातावरण निर्माण झालं आहे. आता राज्याचा आरोग्य विभाग घटनेची चौकशी करत आहे. मात्र डॉक्टरला वाचविण्याचा प्रयत्न होत असल्याचीही टीका करण्यात येत आहे.

Advertisements
Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!