धक्कदायक : चहात साखर कमी काय झाली , संतप्त नवऱ्याने तिचा गळाच चिरला….

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन असताना हत्येचे अनेक धक्कादायक प्रकार समोर येत आहेत. अशाच एका भयानक प्रकारात एका इसमाने अतिशय किरकोळ वादातून आपल्या पत्नीचा गळा चिरुन खून केला असल्याचे वृत्त आहे. चहावरुन या दोघांमध्ये वाद झाल्यानंतर रागाच्या भरात 40 वर्षीय पतीने 35 वर्षीय पत्नीची निर्घृण हत्या केली या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. बबलूकुमार असे या पतीचे तर रेणू असे मृत पत्नीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पत्नीने सकाळी साडेपाच वाजता दिलेल्या चहामध्ये साखरेचं प्रमाण नेहमीपेक्षा कमी होतं. म्हणून संतापलेल्या पतीनं तिचा अक्षरशः जीव घेतला . उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरी जिल्ह्यातील बारबीरमध्ये ही घटना सोमवारी घडली. जेव्हा बायकोने दिलेल्या चहामध्ये साखर कमी असल्यामुळे पती बबलू कुमार रागाने चौताळून उठला. त्याने तिच्याशी वाद घातला आणि पत्नी रेणू (वय 35) हीला मारहाण केली. त्याचा राग ऐवढ्यावरच शांत नाही झाला तर नंतर त्याने धारदार शस्त्राने तिचा गळा कापला.
विशेष म्हणजे आपल्याच वडिलांनी आईला अशा निर्घृणपद्धतीने मारताना पहिले तेंव्हा हि मुले तीन मुलं धावत आली परंतु तिने आपल्या मुलांदेखत अखेरचा श्वास घेतला. मिळालेल्या माहितीनुसार, बबलूने 12 वर्षांपूर्वी रेणूशी लग्न केलं होतं. या जोडप्याला तीन मुलं झाली. या सगळ्या घटनेनंतर रेणूचे वडील बद्री प्रसाद यांच्या तक्रारीवरून बबलूविरोधात आयपीसीच्या कलम 302 (खून) अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, घटना झाल्यानंतर आरोपी पतीने तेथून पळ काढला. पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा शोध घेत असून आरोपीला पकडण्यासाठी परिसरात छापेमारी सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.