उत्तर प्रदेश सरकारला प्रियांका गांधी यांचे रोख ठोक उत्तर , काय कारवाई करायची ती करा ….

जनता के एक सेवक के रूप में मेरा कर्तव्य यूपी की जनता के प्रति है, और वह कर्तव्य सच्चाई को उनके सामने रखने का है। किसी सरकारी प्रॉपगैंडा को आगे रखना नहीं है। यूपी सरकार अपने अन्य विभागों द्वारा मुझे फिज़ूल की धमकियाँ देकर अपना समय व्यर्थ कर रही है।..1/2
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) June 26, 2020
मी इंदिरा गांधी यांची नात आहे, मी भारतीय जनता पक्षाची अघोषित प्रवक्ता नाही, जी कारवाई करायची आहे ती करा, असे उत्तर काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी ट्विटरवरून दिले आहे. कानपूरमधील एका आश्रयगृहातील अनेक मुलींना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर या मुद्दयावरून राजकारण तापत चालले आहे. याच मु्द्द्यावरून काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेश बाल संरक्षण आयोगाने काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी वाड्रा यांना नोटीस पाठवली होती. त्या नोटीशीला आज शुक्रवारी प्रियांका गांधी वाड्रा यांनी वरील शब्दात उत्तर दिले आहे.
.. जो भी कार्यवाही करना चाहते हैं, बेशक करें। मैं सच्चाई सामने रखती रहूँगी। मैं इंदिरा गांधी की पोती हूँ, कुछ विपक्ष के नेताओं की तरह भाजपा की अघोषित प्रवक्ता नहीं।..2/2
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) June 26, 2020
प्रियांका गांधी वाड्रा नोटीशीला उत्तर देताना म्हटले आहे की, जनतेची एक सेविका या नात्याने माझे कर्तव्य उत्तर प्रदेशच्या जनतेप्रती आहे. आणि ते कर्तव्य आहे सत्य लोकांसमोर ठेवणे. माझे काम कोणत्या सरकारी कामांचा प्रचार करणे हे नाही. उत्तर प्रदेश सरकार आपल्या इतर विभागांद्वारे मला व्यर्थ धमक्या देत वेळ वाया दवडत आहे. जी काही कारवाई माझ्यावर करायची असेल, ती बेलाशक करावी. मी सत्य लोकांपुढे मांडत राहीन. मी इंदिरा गांधी यांची नात आहे. काही विरोधी पक्षांच्या नेत्यांसारखी मी काही भारतीय जनता पक्षाची अघोषित प्रवक्ता नाही, असे म्हणत प्रियांका गांधी वाड्रा यांनी उत्तर प्रदेश सरकारला उत्तर देताना इतर पक्षातील नेत्यांनाही टोला लगावला आहे.
दरम्यान कानपूरमधील एका आश्रयगहात गेल्या काही दिवसांपूर्वी खळबळ उडाली होती. आश्रयगृहातील ५७ मुलींना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाली. या व्यतिरिक्त यातील एकूण ६ मुली गरोदर असल्याचेही स्पष्ट झाले होते. यानंतर हा मुद्दा काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी वाड्रा उपस्थित करत होत्या. काही दिवसांपूर्वी प्रियांका गांधी वाड्रा यांनी आपल्या फेसबुक पोस्टवर कानपूर आश्रयगृहात अल्पवयीन मुली गरोदर राहण्यावर आणि विशेषत: एचआयव्ही आणि हेपेटायटीस सी चा संसर्ग होण्याबाबतचा मुद्दा उपस्थित केला होता. यामुळेच उत्तर प्रदेशच्या प्रदेश बाल संरक्षण आयोगाना प्रियांका गांधी वाड्रांना नोटीस धाडली आहे.