AurangabadNewsUpdate : काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष डाॅ.कल्याण काळे तर शहराध्यक्षपदी मो.हिशाम उस्मानी

औरंगाबाद – शहर काॅंग्रेस अध्यक्षपदी प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहैब थोरात यांनी मो.हिशाम उस्मानी आणि जिल्हाध्यक्षपदी डाॅ.कल्याण काळे यांची नियुक्ती केली.प्रदेशाध्यक्ष थोरात यांनी औरंगाबाद बरोबरंच ठाणे, चंद्रपुर, भंडारा, गोंदिया, लातूर येथेही खांदेपालट केली आहे. मावळते शहराध्यक्ष नामदेव पवार आणि प्रभारी जिल्हाध्यक्ष अनिल पटेल यांना राज्यातून केंद्राच्या कमिटीवर घेण्याचा विचार गांभिर्याने केला जात असल्याचे टिळक भवन येथील सूत्रांनी सांगितले