CoronaEffect : लॉकडाऊनमुळे आर्थिक नैराश्य आल्याने हॉटेल व्यावसायिकाची आत्महत्या….

देशात आणि राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून केंद्र आणि राज्य शासनाने घोशोत केलेल्या लॉक डाऊन मुळे अनेकांचे जीवन धोक्यात आले आहे. परिणामी देशात कोरोना बरोबरच उपासमार आणि आर्थिक नुकसानीमुळेही अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. याच नैराश्यातून पुण्यात एका हॉटेल व्यवस्थापकाने व्यवस्थापकाने हॉटेलमध्येच गळफास घेऊन आत्महत्या केली. सदर प्रकार आज गुरुवार सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास उघडीस आला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. प्रेमनाथ कृष्णा शेट्टी (वय: 43 वर्षे, रा. हॉटेल राज, धायरी, ता. हवेली जि. पुणे) असं आत्महत्या केलेल्या हॉटेल व्यवस्थापकाचं नाव आहे.
या प्रकरणी सिंहगड रस्ता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रेमनाथ हे गेल्या सात वर्षांपासून ‘हॉटेल राज’ चालवत होते. लॉकडाऊनमुळे गेल्या चार महिन्यांपासून हॉटेल बंद होतं. त्यामुळे नैराश्य येऊन त्यांनी हॉटेलमध्येच पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. गुरुवारी सकाळी साडे नऊच्या सुमारास एका कर्मचाऱ्याने हॉटेल उघडल्यानंतर सदर घटना उघडीस आली.
दरम्यान, घटनास्थळी सुसाइड नोट मिळाली असून ‘लॉकडाऊनमुळे हॉटेल बंद आहे. त्यामुळे मला नैराश्य आल्यानं मी आत्महत्या करत आहे. माझ्या आत्महत्येस कोणालाही जबाबदार धरू नये’ असं त्यात लिहिलं आहे. पुढील तपास सिंहगड रस्ता पोलीस करीत आहेत. घटनेची माहिती मिळाल्यानंतर, पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी प्रेमनाथ यांचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. तो शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. तर पोलीस सध्या या संपूर्ण प्रकरणाचा कसून तपास करत आहे.