MaharashtraCoronaUpdate : राज्यात करोना संसर्गामुळे एकाच दिवशी १६० जणांचा मृत्यू तर ३ हजार ८७४ नवीन रुग्णांचे निदान

राज्यात आज करोना संसर्गामुळे १६० जणांचा मृत्यू झाला तर ३ हजार ८७४ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. एकाच दिवसातील रुग्णसंख्येचा हा नवा उच्चांक ठरला आहे. सध्या राज्यात ५८ हजार ०५४ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत तर रुग्ण बरे होण्याचा दर सातत्याने ५०.०४ टक्के एवढा असून आज १३८० रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत एकूण ६४ हजार १५३ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे.
आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी आरोग्यमंडळ निहाय मृत्यू पुढीलप्रमाणे , ठाणे -१३६ ( मुंबई १३६), नाशिक-१० ( जळगाव १०), पुणे-६ ( पुणे- १,सोलापूर १), औरंगाबाद-७ (औरंगाबाद ५, जालना- १). कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता ५९८४ झाली आहे. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ७ लाख ५४ हजार नमुन्यांपैकी १ लाख २८ हजार २०५ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ५ लाख ९४ हजार ७१९ लोक होम क्वारंटाइनमध्ये आहेत. सध्या २५ हजार ०९९ लोक संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.
करोनामुळं मुंबईत आज १३६ जणांचा मृत्यू
मुंबईत आज करोनाचे ११९७ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळं मुंबईतील एकूण करोना रुग्णांचा आकडा ६५ हजार २६५वर पोहोचला आहे. तर, करोनामुळं आज १३६ जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईतील करोनाबाधित रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आज करोनाचे ११९७ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळं मुंबईतील एकूण करोना रुग्णांचा आकडा ६५ हजार २६५वर पोहोचला आहे. तर, करोनामुळं आज १३६ जणांचा मृत्यू झाला आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या आकडेवारीनुसार, आज विविध रुग्णालयातून ६१० जणांना डिस्चार्ज मिळाला आहे. आतापर्यंत ३२ हजार ८६७ जणांना घरी सोडण्यात आलं आहे. तर एकूण अॅक्टिव्ह रुग्ण २८ हजार ८३९ आहेत. मुंबईत बरे झालेल्या रुग्णांचा दर ५० टक्के आहे. तर, करोना दुपटीचा वेग २.०५ टक्क्यांवर आला आहे. मुंबईत आज दिवसभरात २ लाख ८३ हजार ११९ करोनाच्या चाचण्या करण्यत आल्या आहेत. आज नोंदवलेल्या १३६ मृत्यूंपैकी ९२ जणांना दीर्घकालीन आजार होते. तर, ९४ रुग्ण पुरूष व ४२ रुग्ण महिला होत्या. मृत्यू झालेल्या ९ रुग्णांचे वय ४० वर्षांखाली होते. तर, ७६ जण ६० वर्षांवर होते. तर उर्वरित ५१ रुग्ण ४० ते ६० वर्षा दरम्यान होते. करोनामुळं आत्तापर्यंत ३ हजार ५५९ जणांना प्राण गमवावे लागले आहेत. मुंबईत करोनाचा आकडा वाढत असला तरी धारावीत मात्र करोनाचा संसर्ग आटोक्यात येत आहे. आज दिवसभरात धारावीत करोनाचे सात रुग्ण आढळले आहेत. तधारावीतील एकूण रुग्णसंख्या २१५८ झाली असून आतापर्यंत ७८ रुग्ण दगावले आहेत.