MumbaiNewsUpdate : सुशांतच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार , राज्यसरकारकडून चौकशीचे आदेश

While the post mortem report says actor @itsSSR committed suicide by hanging himself, there are media reports that he allegedly suffered from clinical depression because of professional rivalry. @MumbaiPolice will probe this angle too.
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) June 15, 2020
बहुचर्चित सिनेअभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर त्याच्या मृत्यूची चौकशी करण्यात यावी अशी मागणी त्याच्या चाहत्यांकडून होत असल्याने खरेच बॉलिवूडमधील स्पर्धेमुळे तो डिप्रेशनमध्ये गेला होता का? याची चौकशी केली जाईल असे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुखं यांनी म्हटले आहे. सुशांतला नैराश्याने ग्रासलं होतं आणि त्यामुळंच त्यानं आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं असल्याचं सांगण्यात येत आहे तर, काहींनी सुशांतच्या आत्महत्येचं मुळं कारण हे बॉलिवूडमधील घराणेशाही हे असल्याचा आरोप केला आहे.
दरम्यान सुशांतच्या शवविच्छेदनाचा अहवाल समोर आला असून यात त्यांचा मृत्यू गळफासामुळेच झाल्याचे कारण नमूद करण्यात आले आहे. त्याचबरोबर तो क्लिनिकल डिप्रेशनमध्ये होता असेही अहवालात म्हटले आहे. याची दखल घेऊन गृहमंत्र्यांनी बॉलिवूडमधील स्पर्धा हेच याचे कारण आहे ? का याची चौकशीचे आदेश दिले आहेत. मुंबई पोलिस या प्रकरणाचा तपास करणार आहेत.
While the post mortem report says actor @itsSSR committed suicide by hanging himself, there are media reports that he allegedly suffered from clinical depression because of professional rivalry. @MumbaiPolice will probe this angle too.
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) June 15, 2020
सुशांतच्या पार्थिवावर विलेपार्ले येथील पवनहंस येथे असलेल्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. सुशांतच्या पार्थिवावर अंत्यसंस्कारासाठी निवडक लोकांचीच उपस्थिती होती. हिंदी सिनेसृष्टी आणि टीव्ही इंडस्ट्रीतले काही लोक सुशांतला अखेरचा निरोप देणअयासाठी आले होते. श्रद्धा कपूर, राजकुमार राव, अभिषेक कपूर, वरुण शर्मा, विवेक ओबेरॉय हे सगळे सुशांतला अखेरचा निरोप देण्यासाठी आले होते.