चर्चेतली बातमी : सुशांत सिंह राजपूतने आपल्या जीवनाची अखेर का केली ?

सिने अभिनेता सुशांतकुमारचा भाऊ पन्ना सिंह याने दिलेल्या माहितीनुसार , सुशांत सिंह राजपूत याचे येत्या नोव्हेंबर महिन्यात लग्न होणार होते नि य विवाह सोहळ्याचं आयोजन करण्याची कुटुंबीयांची तयारी सुरू होती. परंतु, सुशांत कुणासोबत विवाहबद्ध होणार होता, हे मात्र त्यांनी गुलदस्त्यातच ठेवलंय. सुशांतचे नातेवाईक त्याचा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी मुंबईला निघाले आहेत. तिथंच अंत्यसंस्कार कुठे करायचे? याबद्दल निर्णय घेतला जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं. पूर्णिया जिल्ह्यातील मलडिहामध्ये सुशांतचे घर आहे. दरम्यन गेल्या आठवड्यात सुशांत सिंहचे वडील के के सिंह यांच्याशी त्याचं बोलणं झालं होतं. जवळपास ४५ मिनिटे त्यांची चर्चा चालू होती. त्यांनी सर्व काही ठिक असल्याचं सांगितलं होतं.
टाईम्स नाऊ आणि ऑनलाईन वेबसाईटच्या बातम्यांनुसार सुशांत सिंह राजपूत हा काही वर्षांपूर्वी छोट्या पडद्यावरील सह-अभिनेत्री अंकिता लोखंडे हिच्यासोबत रिलेशनशीपमध्ये होता. ‘पवित्र रिश्ता’ या कार्यक्रमात ही जोडी एकत्र दिसली होती. काही काळ सुशांत आणि अंकिता लिव्ह-इन रिलेशनशीपमध्येही राहत होते. मात्र, २०१६ मध्ये या दोघांनी एकमेकांपासून विलग होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर गेल्या काही काळापासून सुशांतचं नाव रिया चक्रवर्ती हिच्यासोबत जोडलं जात होतं. मात्र, दोघांकडूनही याबाबत अधिकृतपणे दुजोरा देण्यात आला नव्हता.
दरम्यान चर्चित बातम्या अशाही आहेत कि , रिया चक्रवर्ती आणि सुशांत दोघेही रिलेशनशिपमध्ये राहत होते आणि सुशांत तिच्यासाठी घराच्या शोधात होता. सुशांत आणि त्याचे मित्र एकत्र बसलेले असताना सुशांत त्याच्या खोत गेला आणि त्याने आत्महत्या केल्याचे वृत्त आले. त्याच्या निधनानंतर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या असल्या तरी रिया चक्रवर्तीची मात्र कोणतीही प्रतिक्रिया आली नाही त्यामुळे रिया अधिक चर्चेत आली आहे. पोलीस सुशांत ने आत्महत्या केल्याच्या तपासावर ठाम असले तरी त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजले नाही. गेल्या काही दिवसांपासून तो डिप्रेशन होता आणि त्याच्यावर उपचारही चालू होते.