UnlockNewsUpdate : धार्मिक स्थळे , मॉल, रेस्टॉरंट, आणि हॉटेल्सवर पडदा उघडण्यास केंद्राची संमती

अनलॉक वन च्या अंतर्गत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी धार्मिक स्थळं, मॉल, रेस्टॉरंट, आणि हॉटेल्ससाठी नियमावली जारी केली आहे. कंटेन्मेंट झोन वगळता इतर भागात ८ जूनपासून म्हणजे येत्या सोमवारपासून धार्मिक स्थळं, मॉल्स, हॉटेल्स आणि रेस्टॉरंट सुरू करण्याची परवानगी दिली आहे. यानुसार अनलॉकच्या पहिल्या टप्प्यात ही ठिकाणं सुरू करण्यात येणार आहेत.
दरम्यान आरोग्य मंत्रालयाच्या नियमावालीनुसार मॉल्स, हॉटेल्स आणि धार्मिक स्थळांवर जाणाऱ्या नागरिकांना फोनमध्ये आरोग्य सेतू अॅप डाऊनलोड करणं बंधनकारक आहे. तसंच तोंडावर मास्क आणि इतरांपासून किमान ६ फूट अंतरराखणं सक्तीचं आहे. नागरिकांची रांग पाहून त्यांना चिन्हांकित जागेवर उभं राहावं लागेल. तसंच करोनाची लक्षणं दिसून येत नाहीए त्यांनाच प्रवेशाची परवानगी देण्यात येणार आहे.
असे आहेत शॉपिंग मॉलसाठी नियम
– शॉपिंग मॉलमध्ये दुकानांमध्ये गर्दी होऊ नये यासाठी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे पालन कराणं गरजेचं आहे. एलिव्हेटरवरही नागरिकांनी एकदम गर्दी करू नये. मर्यादित संख्येत नागरिकांनी एलिव्हेटरचा उपयोग करावा.
– मॉलमधील दुकानं उघडतील पण गेमिंग आर्केड्स, मुलांची खेळण्याची ठिकाणं आणि चित्रपटगृह बंद राहतील , – शॉपिंग मॉलमधील एसी २४ ते ३० डीग्री आणि ह्युमिडीटी ४० ते ७० टक्के ठेवण्याचे निर्देश
हॉटेल्ससाठी नियम असे असतील
– करोनाचा संसर्ग नसलेल्या आणि लक्षणं दिसून येत नसलेल्या कामगारांना आणि ग्राहकांनाच हॉटेल्समध्ये प्रवेश देण्यात येईल. – बिलासाठी हॉटेल्समध्ये रोख रक्कमच्या व्यवहारापेक्षा डिजिटल किंवा ऑनलाइन पर्याय निवडावा, – ग्राहकांसाठी कॉन्टॅक्टलेस चेक-इन आणि चेक-आउटची व्यवस्था केली जावी. – जागेवर ग्राहक बसण्यापूर्वी ते सॅनिटाइज किंवा डिसइन्फेक्ट केली जावी., – ग्राहकांना रुम सर्व्हिस द्यावी. यासाठी आवश्यक असलेलं ऑर्डर किंवा बोलणं हे मोबाइल फोनवर किंवा हॉटेलच्या फोनवरून करावं. रेस्टॉरंटमध्ये बसून खाण्याऐवजी ते ग्राहकांना पार्सल करून द्यावे.
धार्मिक स्थळांसाठी अशा आहेत सूचना
– धार्मिक स्थळांमध्ये प्रवेशापूर्वी भाविकांनी हात-पाय धुवावे. – धार्मिक स्थळांमध्ये प्रार्थना सभांचे आयोजन करू नये. भाविकांनी घरूनच चटई किंवा कापड आणण्याचा सल्ला दिला गेलाय. – प्रसाद वाटप किंवा पवित्र जल शिंपडण्यावर बंदी राहील. – धार्मिक स्थळांमध्ये संगीत वाजेल पण कलाकारांना एकत्रित आणून भजन-किर्तन सारखे कार्यक्रम आयोजित करता येणार नाही. – मूर्ती आणि पवित्र धर्मग्रंथांना हात लावण्यास परवानगी नाही.