अमेरिकन राष्ट्रपतीप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपतीसाठी येताहेत १४०० कोटींची नवी अत्याधुनिक विमानं…

अमेरिकेच्या राष्ट्रपती प्रमाणेच आता भारतातही राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी येत्या सप्टेंबरच्या अखेरीस पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘एअर इंडिया वन’ च्या ताफ्यात दोन खास अपग्रेड केलेल्या बोईंग -777 विमानांमध्ये ‘सेल्फ प्रोटेक्शन सूट’ (एसपीएस)दाखल होणार असल्याचे वृत्त आहे. यासाठी जवळपास सुमारे 1400 कोटी खर्च लागणार आहे. सध्या पंतप्रधान, राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती एअर इंडियाचे बोईंग बी – 747 हे विमान वापरतात. ते जवळपास 20 वर्ष जुने आहेत . राष्ट्रपतींना घेऊन जाणारे विमान जवळपास 26 वर्षे सेवेत आहेत.
उपलब्ध माहितीनुसार या अत्याधुनिक विमानात इन्फ्रारेड आणि इलेक्ट्रॉनिक वॉरफेयर तंत्रज्ञानाचा समावेश असून याव्यतिरिक्त, या विमानात क्षेपणास्त्रांची चेतावणी देणारी यंत्रणा असणार आहे. जी क्षेपणास्त्रांवर गोळीबार करण्यास सक्षम आहे. त्याचबरोबर,या विमानात शत्रूच्या रडार यंत्रणेला बाधा आणण्यास सक्षम तंत्रज्ञानासह सुसज्ज देखील असणार आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या एअरफोर्स वनमध्ये या विमानांचे सुरक्षा उपाय देखील या विमानात असणार आहे. एअर इंडियाने व्हीव्हीआयपी प्रवासासाठी नवीन बोईंग – 777 -300 ईआर विमानांची एक जोडी डलास येथील अमेरिकेतील बोईंग सुविधा केंद्रात पाठविली होती. जिथे त्यांना क्षेपणास्त्र संरक्षण यंत्रणा बसविण्यात येईल.
दरम्यान सध्या पंतप्रधान आणि राष्ट्रपतींसाठी वापरण्यात येणारी दोन्ही विमाने तीन वर्षांपेक्षा कमी जुनी होती आणि क्वचितच वापरली गेली आहेत. या नवीन एअर इंडिया वन विमानात ऑफिसची जागा, मीटिंग रूम आणि कम्युनिकेशन सिस्टम असणार आहे. शिवाय या विमानात इंधन न भरता भारत आणि अमेरिके दरम्यान उड्डाण करण्याची सुविधाही असेल, अशी माहिती मिळाली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम. व्यंकया नायडू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी या विमानांचा वापर केला जाणार आहे. व्हीव्हीआयपी लोकांवर नेहमीच धोका होण्याची शक्यता असते. एखाद्या देशाने आपल्या वरिष्ठ नेतृत्त्वाचे रक्षण करण्यासाठी जे काही उपाययोजना करणे आवश्यक आहे, त्याचाच भाग म्हणून हे विमान तयार करण्यात येत आहे.