AurangabadNewsUpdate : विजेच्या धक्क्याने एक ठार, दोन जखमी

औरंगाबाद – आज दुपारी तीन च्या सुमारास एकतानगरात राशनदुकानदार रस्त्यावरील इलेक्ट्रिक पोलच्या केबल चा शाॅक लागून ठार झाला.तर अन्य दोघे जखमी झाले. या प्रकरणी हर्सूल पोलिस ठाण्याने नोंद घेतली असून विद्यूत निरीक्षकाचा अहवाल आल्यावर या प्रकरणात गुन्हा दाखल होईल.अशी माहिती पोलिस निरीक्षक सचिन इंगोले यांनी दिली.
राहूल ज्ञानेश्वर गायके(३४) एकतानगर असे ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.आज दुपारी पावणे तीन वा रेशनचामाल घेऊन आलेली रिक्षा रस्त्यात बंद पडल्यामुळे तिला राहूल गायके व अन्य दोघे धक्का देत होते. जवळच असलेल्या इलेक्ट्रिक पोलवर जोडलेली केबल होती ती केबल रिक्षाला लागताच राहूल गायके जागेवरच ठार झाला तर अन्य दोघे जखमी झाले.
शाॅक लागून मृत्यू झालेल्या सर्व प्रकरणात राज्यशासनाचे विद्यूत निरीक्षक आपला चौकशी अहवाल पोलिसांना देतात त्या अहवाला नुसार गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया पार पाडली जाते. हर्सूल पोलिसांनी राहूल गायके यांच्या अकस्मात मृत्यूची घेतलेली नोंद विद्यूत निरीक्षक कार्यालयाला प्राप्त झाली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक सचिन इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली हर्सूल पोलिस करंत आहेत.