CoronaWorldUpdate : कोरोनाची माहिती देणाऱ्या आणखी एका डॉक्टरचे निधन , चीनमध्ये एक कोटी लोकांची तपासणी

कोरोनाव्हायरस संसर्गामुळे चीनने मंगळवारी मोठा दावा केला आहे. भारतातील चीनी राजदूत सन वेडॉंग यांनी म्हटले आहे की, चीनच्या वुहानमध्ये गेल्या दोन आठवड्यांत सुमारे 10 दशलक्ष लोकांना कोरोना विषाणूच्या संसर्गाची तपासणी करण्यात आली. परंतु या काळात कोविड 19 संसर्गाचा एकही रुग्णाची नोंद झालेली नाही. या कालावधीत 300 लोकांमध्ये लक्षणं नसल्याचे समोर आले आहे. त्यांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. तसेच, त्यांच्या संपर्कांवर आलेल्या 1174 लोकांनाही अलग ठेवण्यात आले आहे. वुहान हे कोरोना विषाणूचे मूळ मानले जाते.
या रूग्णांमध्ये ताप, खोकला किंवा घसादुखी यांसारखी लक्षणे आढळली नाहीत परंतु तरीही त्यांना तपासणीत संसर्ग झाल्याचे दिसून आले. त्यांच्यामुळे इतरांना संसर्ग होण्याचा धोका असतो. यापूर्वी आलेल्या माहितीनुसार चीनमध्ये 15 नवीन रुग्णांची नोंद झाली होती. राष्ट्रीय आरोग्य आयोगाने (एनएचसी) म्हटले आहे की, सोमवारी देशाबाहेरुन आलेले पाच लोक संसर्गित असल्याचे आढळले. त्याच वेळी 10 लोक कोणतीही लक्षणांशिवाय संसर्गित असल्याचे आढळले. आयोगाने म्हटले आहे की, आतापर्यंत कोणतीही लक्षणांशिवाय संक्रमित झालेले 371 लोकांपैकी 39 परदेशातून आलेले आहेत. हे सर्व वैद्यकीय निरीक्षणाखाली आहेत.
कोरोनाची माहिती देणाऱ्या आणखी एका डॉक्टरचे निधन
दरम्यान चीनमध्ये करोना विषाणू संसर्गाची माहिती देणाऱ्या डॉक्टरांच्या पथकात सहभागी असणाऱ्या डॉ. हू वीफेन्ग यांचा करोनाच्या संसर्गाने मृ्त्यू झाला आहे. डॉक्टर हू वीफेन्ग हे चीनच्या वुहान येथील सेंट्रल हॉस्पिटलमध्ये युरोलॉजिस्ट म्हणून ते काम करत होते. करोनाच्या संसर्गाबाबत पहिल्यांदा माहिती देणाऱ्या व्हिसलब्लोअर डॉक्टर ली वेनलियान्ग यांच्या टीममध्ये हू यांचा समावेश होता. मागील चार महिन्यांपासून हू वीफेन्ग यांची करोनाच्या संसर्गासोबत झुंज सुरू होती. मागील काही दिवसांत त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली होती. त्यामुळे त्यांचा व्हेंटिलेटर हटवण्यात आला होता. करोनामुळे मृत्यू झालेले डॉक्टर हू वीफेन्ग हे या रुग्णालयातील सहावे डॉक्टर आहेत.
डॉक्टर हू यांच्या निधनानंतर चीनमध्ये प्रशासनावर रोष व्यक्त करण्यात येत आहे. डॉक्टर हू यांच्या निधनाबाबत रुग्णालयाच्यावतीने अधिक माहिती देण्यात आली नाही. करोनाच्या विषाणूची माहिती देणारे डॉ. ली वेनलियान्ग यांचाही करोनाच्या संसर्गाने मृत्यू झाला. प्रशासनाला ली यांनी माहिती दिल्यानंतर त्यांना याबाबत काहीही वाच्यता न करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यांच्या मृत्यू पश्चात ली यांच्या कुटुंबीयांची प्रशासनाने आणि कम्युनिस्ट पक्षाने माफी मागितली होती.
भारत -चीन सीमेवर तणावाचे वातावरण
दरम्यान एका बाजूला जगभर कोरोनाची चर्चा चालू असताना चीन मात्र आल्या सीमावर्ती भागात शेजारी राष्ट्रांवर दबाव निर्माण करीत आहे . त्याचाच एक भाग म्हणून भारत आणि चीनची या दोन्ही देशांच्या लष्करात तणाव निर्माण करणाऱ्या काही घटना घडल्यानंतर दोन्ही बाजुंना सैन्य तैनात करण्यात आले आहे. त्यामुळेच तयारी म्हणून चीननं हे पाऊल उचलल्याचं समोर येत आहे. उल्लेखनीय म्हणजे, अमेरिकेनंही भारत-चीन तणावासंबंधी चिंता व्यक्त केली होती. भारत आणि चीनची सीमा उंचावर आहे
या बाबत प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार लडाखमध्ये भारत आणि चीनच्या सैन्यादरम्यान गेल्या अनेक दिवसांपासून तणावाचे वातावरण आहे. या तणावपूर्ण परिस्थितीतच चीनने रात्रीच्या अंधारात तिबेट भागात युद्धाचा सराव केल्याचे समोर आले आहे. यामुळेच दोन्ही देशांमध्ये पुन्हा एकदा तणाव निर्माण झालाय. चीनच्या ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’च्या तिबेट मिलिटरी कमांडनं सोमवारी रात्री उशिरा ४,७०० मीटर उंचीवर सैन्य पाठवून कठिण परिस्थितीतील आपल्या क्षमतांचं परिक्षण केलं. चीनी वर्तमानपत्र ‘ग्लोबल टाईम्स’नं या युद्धाभ्यासाची माहिती दिली आहे. दरम्यान चीन सेंट्रल टेलिव्हिजन (CCTV) नं दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री १ वाजता PLA च्या स्काऊट युनिटने तांगुला या टेकडीकडे वाटचाल सुरू केली. या मार्च दरम्यान गाड्यांच्या लाईट बंद ठेवण्यात आल्या होत्या.