लॉकडाऊनमुळे ” तो ” बेरोजगार झाला आणि त्याने उचलले हे टोकाचे पाऊल … !!

कोरोनामुळे देशात सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे बेरोजगार झाल्यामुळे एका तरुणाने धावत्या रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केली. भानू प्रताप गुप्ता असे तरुणाचे आहे. आत्महत्येपूर्वी त्याने चिठ्ठी लिहिली होती. त्याच्या खिशात ती चिठ्ठी आढळून आली. त्यात त्याने गरीबी आणि बेरोजगारीचा उल्लेख केला आहे. इतकी भीषण गरीबी आहे की मी मेल्यानंतरही कुटुंबाकडे अंत्यसंस्कारासाठी पैसे नाहीत, अशी व्यथा त्याने मांडली आहे. भानू प्रताप गुप्ता हा जिल्ह्यातील मैगलगंज इथला राहणारा होता. शाहजहांपूरमधील एका हॉटेलमध्ये काम करत होता. लॉकडाऊनमुळे भानू घरीच होता. त्याची आर्थिक स्थितीही बिकट होती. घरात काही खायलाही नव्हतं आणि आपल्या म्हाताऱ्या आईच्या उपचारासाठीही त्याच्याकडे पैसेही नव्हते. दोघांनाही श्वसनाचा आजार होता.
जिल्हा प्रशासनाने मात्र त्याच्याकडे पुरेसे अन्न होते असा खुलासा करताना म्हटले आहे कि , लॉकडाऊनच्या आधी भानू गुप्ता शाहजहानपूरमध्ये तो गायत्री रेस्टॉरंटमध्ये काम करत होता. त्याने आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहिली आहे. त्यात काही कारणांचा उल्लेख आहे. याप्रकरणी प्राथमिक तपास सुरू आहे. भानूचे रेशन कार्ड आहे. त्यानुसार या महिन्यात २० किलो गहू, १५ किलो तांदूळ त्याने घेतलेत. दुसऱ्या टप्प्यात ५ किलो तांदूळ आणि १ किलो हरभरे घेतले. यामुळे कुटुंबात अन्नाची कुठलीही कमतरता नव्हती. त्यांच्याकडे पुरेसं अन्न होतं. यामुळे आत्महत्या कुठल्या कारणांमुळे केली, याचा तपास करण्यात येतोय. तपासाचा अहवाल आल्यावर ते स्पष्ट होईल, अशी माहिती लखीमपूर खीरीचे जिल्हाधिकारी शैलंद्र कुमार सिंह यांनी दिली.
मयत भानूला तीन मुली आणि एक मुलगा आहे. घराची संपूर्ण जबाबदारी भानुच्या खांद्यावर होती. जबाबदारीच्या ओझ्याने आणि परिस्थिती अतिशय बिकट झाल्याने भानू हरला आणि आत्महत्या केली. त्याच्या खिशातून आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी मिळालीय. रेशनच्या दुकानातून गहू, तांदूळ मिळत होते. पण ते कुटुंबासाठी पुरेसे नव्हते. चहापत्ती, साखर, भाजी, मसाळे आणि रोज लागणाऱ्या वस्तू उधारीवरही मिळत नव्हत्या. मी आणि माझी आई दीर्घ काळापासून आजारी आहे. गरीबीमुळे तडपत-तडपत जगतोय. सरकार-प्रशासनाकडून कुठलीही मदत मिळाली नाही. मी मेल्यानंतरही कुटुंबाकडे अंत्यसंस्कारासाठी पैसे नाही, इतकी गरीबीची स्थिती आहे, असं भानुने चिठ्ठीत लिहिलंय.