SadNews : बेरोजगारीच्या नैराश्यातून पित्याने लेकीच्या वाढदिवशीच मुलाचा नदीत बुडवून मारले…

कोरोनाच्या संसर्ग आटोक्यात यावा म्हणून देशात लॉकडाऊन चालू असल्यामुळे अनेक उद्योगधंदे बंद आहेत तर मजुरांना आणि कामगारांना काम मिळत नाही. अनेक उद्योगांवर गदा आल्यानं बेरोजगारी वाढली आहे. आधीच हातात काम नाही त्यामुळे खूप ताण होता. परिणामी वंश संपवण्याचा निर्णय वडिलांनी घेतला आणि आपल्या पोटच्या मुलाला संपविल्याची घटना मध्यप्रदेशात घडली आहे . या प्रकरणी पोटच्या मुलाची नदीत बुडवून हत्या करणारा आरोपी पिता पोलिसांच्या ताब्यात असून जायस्वाल कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. यानिमित्ताने मुलीच्या वाढदिवसाचा केक आणण्यासाठी गेलेल्या वडिलांनी पोटच्या मुलाची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
दरम्यान मुलीच्या वाढदिवशी चांगलं सरप्राइज मिळण्याऐवजी भाऊ गेल्याचं दु:ख या बालिकेला झालं आहे. मध्य प्रदेशातील बालाघाट परिसरातील हा भयंकर प्रकार समोर आला आहे. 8 वर्षांच्या मुलाचे दोन्ही हात बांधून वैनगंगा नदीत बुडवून हत्या केली आहे. हत्येनंतर वडिलांनी पहिलं घर गाठलं. पोटच्या मुलाची हत्या केल्याचं कुटुंबीयांना सांगून त्यांनी स्वत: पोलिसांच्या स्वाधीन केलं. मुलीच्या वाढदिवसाचा केक आणण्याच्या बहाण्यानं त्यांनी लहान मुलाला सोबत नेलं आणि वाटेत वैनगंगा नदीत दोन्ही हात बांधून त्याला बुडवून मारल्याची कबूली पोलिसांनी दिली आहे. कोतवाली टी आय विजय परस्ते यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी सुनील जायस्वाल नावाच्या व्यक्तीनं आपल्या पोटच्या मुलाल संपवलं. आधीच काम नाही, बेरोजगार असल्यानं वंश संपवण्यासाठी हे धक्कादायक पाऊल उचललं असल्याचं आरोपीनं कबुली दिली.