MaharashtraCoronaUpdate : डॉक्टरांच्या बाबतीत राज्य शासनाचा मोठा निर्णय

राज्यात कोरोनाविरुद्ध लढा देण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या डॉक्टरांबाबत राज्य सरकारनं महत्त्वपूर्ण निर्णय घेतला या निर्णयानुसार बंधपत्रित (बॉण्डेड) डॉक्टर्सच्या मानधनात मोठी वाढ करण्याचा तसेच कंत्राटी डॉक्टर्सचे आणि त्यांचे मानधन समान करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी याबाबत माहिती दिली. कोरोना लढाईला यामुळे निश्चितपणे बळ मिळणार आहे. डॉक्टर्सना सुद्धा यामुळे प्रोत्साहन मिळणार आहे. हा निर्णय पुढील प्रमाणे आहे.
आदिवासी भागातील बंधपत्रीत डॉक्टर्सना 60 हजारांच्या ऐवजी 75 हजार , आदिवासी भागातील बंधपत्रीत विशेषज्ज्ञ डॉक्टर्सना 70 हजार ऐवजी 85 हजार, इतर भागातील एमबीबीएस डॉक्टर्सना 55 हजारांऐवजी 70 हजार, इतर भागातील विशेषज्ज्ञ डॉक्टर्सना 65 हजारांऐवजी 80 हजार रुपये
दरम्यान दुसरीकडे, देशात कोरोनाबाधितांच्या संख्या दिवसेदिवस वाढत असताना मुंबई हे कोरोनाचं केंद्र झालं आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत केवळ रुग्णांच्या वाढीचं नाही तर रुग्णालयाचंही मोठं संकट आहे. कोरोना रुग्णांचा आकडा वाढत असला तरी, त्यांची सोय करण्यासाठी मुंबई महानगर पालिकेकडे विशेष सोय नसल्याचं दिसत आहे. पालिकेच्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत शहरातील 99 टक्के अतिदक्षता विभागातील बेड (ICU Beds) आणि 72 टक्के व्हेंटिलेटर व्यापलेले आहेत. जी रुग्णालयं कोव्हिड-19च्या गंभीर रुग्णांवर उपचार करत आहेत ती देखील 96 टक्के भरले आहेत आणि सरकार सांगत आहे कि , आरोग्याच्या दृष्टीने कुठल्याही प्रकारची असुविधा नाही . लोकांनी काळजी करण्याचे कारण नाही.