AurangabadNewsUpdate : सिपेट येथील कोविड रुग्णालयाची पालकमंत्र्यांनी केली पाहणी

उद्योगमंत्री तथा औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी चिखलठाणा औद्योगिक परिसरातील सिपेट (केंद्रीय प्लास्टिक आणि अभियांत्रिकी संस्था)(मेलट्रॉन) इमारतीत नव्याने उभारण्यात येत असलेल्या कोविड 19 रुग्णालयाची आज सकाळी पाहणी केली.
कोरोना विषाणूच्या अनुषंगाने आरोग्य सेवेसाठी रुग्णालयाची आवश्यकता लक्षात घेऊन; खबरदारीचा उपाय म्हणून चिखलठाणा येथील मेलट्रॉन इमारतीत कोविड 19 रुग्णालयाची उभारणी श्री. देसाई यांच्या निर्देशानुसार करण्यात आली आहे. या कोविड रुग्णालयात उपलब्ध करून देण्यात येत असलेल्या सर्व सोयी सुविधांची माहितीही श्री.देसाई यांनी घेतली. यावेळी त्यांच्यासमवेत माजी खासदार चंद्रकांत खैरे, जिल्हाधिकारी उदय चौधरी, मनपाचे आयुक्त तथा प्रशासक आस्तिक कुमार पांडेय, एमआयडीसीचे मुख्य अभियंता सुभाष तुपे, कार्यकारी अभियंता श्री.हर्षे, उपअभियंता रवींद्र कुलकर्णी, उपविभागीय अधिकारी डॉ. ज्ञानोबा बानापुरे, मनपाच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर, डॉ.गुप्ता, अभय जरीपट्टे आदींची उपस्थिती होती.
जिल्ह्यात 28 रुग्णांची वाढ, 481 रुग्णांवर उपचार सुरू
औरंगाबाद जिल्ह्यात सकाळी 28 रुग्णांची वाढ झाल्याने एकूण कोरोनाबाधितांची संख्या 1487 झाली आहे. यापैकी 937 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून 69 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने आता 481 रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.
आज आढळलेल्या रुग्णांचा तपशिल पुढील प्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) जुना बाजार (2), मुझफ्फर नगर, हडको (1), व्यंकटेश नगर (1), सुराणा नगर (2), नारळी बाग (2), शिवशंकर कॉलनी (2), हमालवाडी (1), न्यु वस्ती जुनाबाजार (1), भवानी नगर, जुना मोंढा (5), मनजीत नगर, आकाशवाणी परिसर (1), शिवाजी नगर (1), उस्मानपुरा (4), रेहमानिया कॉलनी (1), रोशन गेट परिसर (2), नारेगाव परिसर (1), न्याय नगर (1) या भागातील रुग्ण आहेत. यामध्ये 18 पुरूष आणि 10 महिला रुग्णांचा समावेशी आहे.