#CoronaVirusUpdate : देश : गेल्या २४ तासांमध्ये आढळले ६ हजाराहून अधिक रुग्ण , दिड लाखांना कोरोनाची बाधा

Spike of 6387 new COVID19 cases & 170 deaths in the last 24 hours. Total number of cases in the country now at 1,51,767 including 83004 active cases, 64425 cured/discharged and 4337 deaths: Ministry of Health and Family Welfare pic.twitter.com/wWyo78g4pC
— ANI (@ANI) May 27, 2020
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज सकाळी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत देशभरात एकूण १ लाख ५१ हजार ७६७ लोकांना करोनाची बाधा झाली आहे तर, यांपैकी ६४ हजार ४२६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आता पर्यंत करोनामुळे एकूण ४ हजार ३३७ रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. गेल्या २४ तासांमध्ये एकूण ६ हजार ३८७ नवे करोनाबाधित रुग्ण आढळले असून १७० रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
देशात सर्वाधिक मृत्यूची नोंद महाराष्ट्रात झाली आहे. महाराष्ट्रात एकूण १,७९२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, तामिळनाडूत एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या १७ हजारांहून अधिक झाली आहे. तामिळनाडूत करोनाबाधित रुग्णांची संख्या पोहोचली १७,७२८ वर. राज्यात करोनामुळे आतापर्यंत १२७ लोकांचा मृत्यू झाला आहे. या बरोबरच बिहार राज्यातही करोनाचे रुग्ण वाढले आहेत. बिहारमध्ये स्थलांतरित मजूर परतल्यानंतर राज्यात करोनाबाधित रुग्णांची संख्या तीव्र गतीने वाढत आहे.
दरम्यान महाराष्ट्रात कोरोनाचा कहर काही थांबत नाही आहे. गेल्या २४ तासांत महाराष्ट्रात २०९१ नवीन प्रकरणं समोर आली आहेत. तर यात ९७ लोकांचा मृत्यू झाला आहे. ही संख्या सर्वात जास्त आहे. मुंबईमध्ये गेल्या २४ तासांत १००२ रुग्णांची नोंद झाली आहे तर ३९ रुग्णांचा मृत्यूझाला आहे. मुंबईत आता एकूण कोरोबाधितांची संख्या ३२ हजार ९७४ झाली आहे. तर, १०६५लोकांचा मृत्यू झाला आहे.
महाराष्ट्रात ५ लाख लोकांना केले क्वारंटाइन : अनिल देशमुख
राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार लॉकडाउन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोव्हिड संदर्भात अत्यावश्यक सेवेसाठी ४,३०,६७६ पास पोलीस विभागामार्फत देण्यात आले. तसंच५, ६५, ७२६ व्यक्तींना क्वारंटाइन करण्यात आलं आहे, अशी माहिती दिली आहे. राज्यात लॉकडाउनच्या म्हणजे दिनांक २२ मार्च ते २५ मे या कालावधीत कलम १८८ नुसार १, १५, २६३ गुन्हे नोंद झाले असून २३, २०४ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. विविध गुन्ह्यांसाठी ५ कोटी ४८ लाख ६२ हजार ९४७ रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.