लॉकडाऊनच्या काळातील व्हायरल प्रेमकथा : ४५ दिवसात त्यांच्या प्रेमाला अंकुर फुटला आणि शुभमंगलही झाले ….

जगात प्रेम हि अशी एक भावना आहे कि , ती कोणाला , कुठे कधी होईल सांगता येत नाही सध्याच्या कोरोना व्हायरसच्या काळातही अशीच एक कथा उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये साकार झाली आहे. हि कथा परिस्थितीमुळे राष्ट्यावर रस्त्यावर भीक मागणाऱ्या मुलीची आणि लॉक डाउनच्या काळात त्यांना अन्नदान करण्यासाठी जात असलेल्या तरुणाची आहे. विशेष म्हणजे त्यांच्या प्रेमाचे रूपांतर लगेच विवाहात झाले आणि हा अनोखा विवाह सोहळा नुकताच पार पडला असल्याचे वृत्त आहे . कानपूरमध्ये राहणाऱ्या अनिल आणि नीलम यांच्या प्रेम आणि लग्नाची ही अनोखी गोष्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे आणि त्यांच्या लग्नाचे व्हीडिओही सगळीकडे शेअर होत आहेत.
या कथेची पटकथा अशी कि , या प्रकरणातील नायिका नीलमला आई-वडील नाहीत त्यामुळे ती आपल्या भावाबरोबर राहात होती मात्र भाऊ आणि वहिनीशी न पटल्याने तिला त्यांनी घर सोडायला लावलं. परिणामी बेसहारा नीलमला रस्त्यावर राहण्यावाचून पर्याय उरला नाही. ती भिकाऱ्यांबरोबर राहू लागली आणि कुणी देईल ते, मिळेल ते खाऊ लागली. दरम्यान त्याच वेळी कोरोनाव्हायरसची साथ सुरू झाली आणि देशभरात लॉकडाऊन झाला. तसा कानपूरमध्येही लॉकडाऊन जाहीर झाला. रोजचं दोन वेळचं पोट भरणं मुश्कील झालं.
दरम्यान शहरातील काही दानशूर लोक अन्नदान करत त्यावरच नीलम आणि तिच्यासारख्या भिकाऱ्यांचं पोट भरत असे. नीलम कानपूरच्या ज्या भागात आश्रयाला होती, तिथून एक लालता प्रसाद नावाचे व्यापारी जात होते. त्यांनी नीलमला पाहिलं आणि तिला जेवण दिलं. या भागातल्या गरजवंतांना रोज जेवण पुरवायचं काम त्यांनी आपल्या ड्रायव्हरकडे सोपवलं. ड्रायव्हर अनिल जेवण द्यायच्या निमित्ताने आता रोजच या भागात येऊ- जाऊ लागला. त्यातून त्याची नीलमशी ओळख झाली आणि वाढली. त्या दोघांमध्ये प्रेमाचा अंकुर फुलू लागला. ४५ दिवस सलग अनिल या भागात अन्नदान करण्याच्या निमित्ताने येत होता. अनिलच्या आई-वडिलांना या प्रेमाविषयी समजलं, तेव्हा त्यांनी नीलमची भेट घेऊन ती लग्न करायला तयार आहे का विचारलं आणि तिने होकार देताच नीलम आणि अनिलचं अशा प्रकारे लग्न ठरलं आणि झालंही….