#CoronaEffect : क्वारंटाईन मधून बाहेर काढण्यासाठी २५ हजारात कोरोना निगेटिव्ह प्रमाणपत्र देणारा गजाआड

संकट समस्या कोणत्याही असोत ठगांना लोकांना फसविण्यासाठी अनेक बहाणे असतात कोरोना संकटाच्या काळातही देशातील वेगवेगळ्या भागांतून आपल्या राज्यात प्रवेश करणाऱ्या नागरिकांना वैद्यकीय प्रमाणपत्रे देणाऱ्या ठगांचा सुळसुळाट झाला आहे परंतु तक्रारीशिवाय त्यांना अटक करणे अवहनात्मक काम आहे. असाच एक प्रकार बंगळुरूमध्ये उघड झाला. वृद्ध दाम्पत्याला ‘करोना निगेटिव्ह सर्टिफिकेट’ मिळवून देतो असं सांगून २५ हजार रुपये उकळण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका ठगाला पोलिसांनी अटक केली आहे .
त्याचे झाले असे कि , कर्नाटकात परतणाऱ्या अनेक जणांना त्यांच्या खर्चाने इन्स्टिट्युशनल क्वारंटाईन केले जात आहे. यासाठी काही पैसे आकारून हॉटेल्सही क्वारंटाईन सेवा उपलब्ध करून देत आहेत. अशाच एका खासगी हॉटेलमध्ये दिल्लीहून परतलेलं एक वृद्ध दाम्पत्य क्वारंटाईनसाठी पोहचलं. हॉटेलमध्ये दाम्पत्याशिवाय ७० जण तसंच हॉटेलच्या २० जणांचा स्टाफही होता. या जोडप्याला पाहून मदत करण्याच्या बहाण्यानं कृष्णा गौडा (५६ वर्ष) नावाच्या एका व्यक्तीनं त्यांच्याशी हॉटेलमध्ये संपर्क साधला. गौडाने या दाम्पत्याला किती दिवसांपासून क्वारंटाईन आहात? असा प्रश्न विचारला. परंतु, कृष्णाची भामटेगिरी या वृद्ध दाम्पत्याच्या लगेचच लक्षात आली. त्यांनी आपल्या फोनचा रेकॉर्डर सुरू करून पुढचं संभाषण रेकॉर्ड केले.
दरम्यान या दाम्पत्याने आम्ही क्वारंटाईनसाठी १४ दिवसांचे १९,६०० रुपये भरल्याचं सांगितले . यावर कृष्णाने त्यांना ‘करोना निगेटिव्ह सर्टिफिकेट’ मिळवून देण्याचे आश्वासन देत क्वारंटाईनमधून बाहेर काढतो मग तुम्ही घरी जाऊ शकाल, अशी बतावणी केली. यासाठी त्यानं २५ हजारांची मागणीही केली. यानंतर, दाम्पत्याने लगेचच बीबीएमी मेडिकल ऑफिसर डॉ. नंदा यांना फोन करून याबद्दल माहिती दिली. त्यांनी ताबडतोब गौडा याच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी लगेचच मैसून रोडहून गौडाला अटक केली.