चर्चेतली बातमी : पंतप्रधान मोदींच्या २० लाखाच्या पॅकेजवर काय बोलल्या सोनिया गांधी ?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेले २० लाख कोटींचे पॅकेज म्हणजे देशाची क्रूर थट्टा आहे अशी टीका काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केली आहे. दरम्यान देशभरातल्या स्थलांतरित मजुरांच्या १३ कोटी कुटुंबीयांकडे केंद्र सरकारने सपशेल दुर्लक्ष केल्याचेही सोनिया गांधी यांनी म्हटलं आहे. पीटीआयने या याबाबत वृत्त दिले आहे.तसेच अशा प्रकारचे पॅकेज जाहीर करण्यापूर्वी पंतप्रधानांना आपल्या विरोधी पक्षांसोबत केली पाहिजे असे वाटत नाही . त्यामुळे त्यांनी आपला यांनी एकतर्फी निर्णय घेऊन टाकला असेही सोनिया गांधींनी म्हटले आहे.
PM's grand Rs 20 lakh crore package has turned out to be cruel joke on country: Cong chief Sonia Gandhi at opposition meet
— Press Trust of India (@PTI_News) May 22, 2020
मागील आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २० लाख कोटींचं पॅकेज जाहीर केल्यानंतर या पॅकेजमध्ये शेतकरी, स्थलांतरित मजूर, लघु आणि मध्यम उद्योजक आणि गरीबांसाठी हे पॅकेज जाहीर करण्यात आल्याचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी चार दिवस पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले. मात्र हे सगळं पॅकेज म्हणजे देशाची क्रूर थट्टा आहे अशी टीका आता सोनिया गांधी यांनी केली आहे.