#CoronaVirusUpdate : महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या ३७ हजारपार , जाणून घ्या तुमच्या जिल्यातील रुग्णांची संख्या …

आज दिवसभरात राज्यात कोरोनाचे १२०२ रुग्ण बरे होऊन त्यांना घरी सोडण्यात आले. आतापर्यंत एकाच दिवसांत बरे झालेल्या रुग्णांची ही सर्वाधिक संख्या असून, राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर सुमारे २५ टक्के आहे. करोनाचे रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी १४ दिवसांवर नेण्यात आला आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात नॉन रेड झोनमध्ये बऱ्यापैकी शिथिलता देण्यात आली असून, खासगी डॉक्टर आणि सरकार यांच्यात समन्वयासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले. राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांचा आकडा ३७ हजार १३६ इतका झाला आहे.
महाराष्ट्रात मंगळवारी ७६ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यात मुंबईतील ४३ रुग्णांचा समावेश आहे. त्याशिवाय ठाणे शहरात १५, पुण्यात सहा, अकोल्यामध्ये तीन रुग्ण तर नवी मुंबई, बुलडाणा आणि नागपूर शहरात प्रत्येकी दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे राज्यातील एकूण करोना बळींची संख्या १ हजार ३२५ इतकी झाली आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी रात्री उशिरा दिली.
आज झालेल्या ७६ मृत्यूपैकी ५० पुरूष आणि २६ महिला रुग्ण आहेत. ६० वर्षे किंवा त्यावरील वयोगटातील ३० रुग्ण, ४० ते ५९ वयोगटातील ३९ रुग्ण आणि ४० वर्षांखालील सात रुग्णांचा समावेश आहे. गेल्या २४ तासांत राज्यात २ हजार १२७ नव्या रुग्णांची नोंद झाली असून, राज्यातील एकूण करोना बाधित रुग्णांचा आकडा ३७ हजार १३६ इतका झाला आहे. राज्यात आज १ हजार २०२ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आजपर्यत एकूण ९ हजार ६३९ रुग्ण बरे झाले आहेत असे टोपे म्हणाले. मुंबई महापालिका हद्दीतील रुग्णांची एकूण संख्या २२ हजार ७४६ झाली असून, मुंबईत करोना बळींची एकूण संख्या ८०० इतकी झाली आहे. तर पुणे महापालिका हद्दीत रुग्णांची संख्या ३ हजार ८४६ झाली असून, मृतांची एकूण संख्या २०२ झाली आहे.
दरम्यान मुंबईत १०० हून अधिक करोना पॉझिटिव्ह रुग्ण ‘बेपत्ता’ आहेत. हे अनेक कारणांमुळे होत असून, त्यात रुग्णांची माहिती चुकीची नोंदवणे हे मुख्य कारण आहे, असं पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी मुंबई मिररला सांगितले. कोरोना बाधित रुग्ण आढळल्यामुळे चर्चगेट येथील वरिष्ठ आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांचे निवासस्थान असणाऱ्या ‘ यशोधन ‘ इमारतीचा एक मजला सील करण्यात आला आहे. संबंधित सोसायटीने पालिकेने दिलेले सर्व निर्देश पाळावेत असे आदेशही पालिका प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.
एकाच दिवसात १२०२ रुग्ण करोनामुक्त
राज्यात आज करोनाचे १२०२ रुग्ण बरे होऊन त्यांना घरी सोडण्यात आले. आतापर्यंत एकाच दिवसांत बरे झालेल्या रुग्णांची ही सर्वाधिक संख्या आहे. राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर आता सुमारे २५ टक्के आहे. करोनाचे रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी १४ दिवसांवर नेण्यात यश आले आहे, अशी माहिती आज आरोग्यमंत्र्यांनी आधीच दिली होती. लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात नॉन रेड झोनमध्ये बऱ्यापैकी शिथिलता देण्यात आली असून, खासगी डॉक्टर आणि सरकार यांच्यात समन्वयासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली असल्याचेही ते म्हणाले होते.