#CoronaVirusEffect : जाणून घ्या एका क्लिकवर देश – दुनिया आणि महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्त रुग्णांची या क्षणाची संख्या : एक नजर

गेल्या २४ तासांत करोनाचे ४९८७ नवीन रुग्ण आढळले आहेत. तर तब्बल १२० मृत्युंची नोंद करण्यात आलीय. भारतातील करोना व्हायरसच्या मृत्युंचा हा एका दिवसातील सर्वात मोठा आकडा ठरलाआहे . भारतातील एकूण करोनाबाधित रुग्णांच्या संख्येनं ९० हजारांचा टप्पा ओलांडला असून यातील २,८७२ जणांचा मृत्यू झाला आहे तर ३४,१०९ रुग्णांनी या आजारावर यशस्वीरित्या मात केली आहे. देशात अजूनही ५३,९४६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. करोनाबाधित रुग्णांची संख्या दिल्ली, मुंबई, अहमदाबाद, पुणे आणि चेन्नईमध्ये या शहरांत जास्त असल्याचं दिसून येतं आहे . या शहरांत जवळपास ४६ हजार करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. केवळ मुंबईतच १९ हजारांहून अधिक रुग्ण सापडले आहेत.
World Total Patients : 4,722,233 | Deaths: 313,266 (15%) | Recovered: 1,813,020 (85%)
India Total Patients : 90,927 | Deaths: 2,872 ( 8%) | Recovered: 34,224 (92%)
Maharashtra Total Patients : 30706 | Deaths: 1135 | Recovered : 7088
दुनिया : जगातील एकूण कोरोना बाधितांची संख्या ४७ लाखांवर गेली असून ३ लाखांहून अधिक मृत्यू झाले आहेत तर १८ लाख लोकांवर यशस्वी उपचार करण्यात आले आहेत. कोरोनगरसाटांची सर्वाधिक संख्या अमेरिकेत असून भारत या जागतिक महामारीत ११ व्या क्रमांकावर पोहोचला आहे तर कोरोनाचा प्रारंभ केंद्र असलेला चीन आता १३ व्या क्रमांकावर गेला आहे.