#CoronaVirusUpdate : देशातील करोना रुग्णांची संख्या ६७ हजाराच्या वर , गेल्या २४ तासांत ४२१३ नवे रुग्ण

As per revised policy, mild/very mild/pre-symptomatic cases admitted to COVID care facility can be discharged after 10 days of symptom onset & if there is no fever for 3 days. No need to test before discharge, home isolation advised after discharge: Lav Agarwal, Health Ministry https://t.co/tlTkIc1oS6
— ANI (@ANI) May 11, 2020
देशातील करोना रुग्णांची संख्या ६७,१५२ इतकी झाली आहे. यापैकी २०९१७ जण बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर सध्या ४४०२९ जणांवर उपचार सुरू आहेत. गेल्या २४ तासांत ४२१३ नवे रुग्ण आढळून आले. तर १५५९ जण बरे झाले. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून आता ३१.१५ टक्क्यांवर गेले आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली. करोना रुग्णांना डिस्चार्ज करण्याच्या संदर्भातील नियमांत बदल करण्यात आला आहे. अनेक देशांनी लक्षणं, चाचण्यांच्या आधारावर आणि कालावधीनुसार नियम बदलले आहेत. तसंच देशातही करोना रुग्णांना डिस्चार्ज करताना आता नियम बदलण्यात आले आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी दिली.
डिस्चार्जच्या नव्या नियमांनुसार सौम्य ते अति सौम्य आणि लक्षणं दिसण्यापूर्वीच्या रुग्णांना उपचारानंतर कोविड रुग्णालयातून १० दिवसांनंतर डिस्चार्ज देण्यात येईल. पण गेल्या तीन दिवसांत संबंधित रुग्णाला ताप आला नसेल तरच हा डिस्चार्ज दिला जाईल. अशा रुग्णांना डिस्चार्ज देताना चाचणीचे बंधन राहणार नाही. त्यांना घरीच क्वारंटाइन राहण्याचा सल्ला देण्यात येईल, असं अग्रवाल यांनी स्पष्ट केलं. करोना व्हायरसचा संसर्ग हा जात, धर्म बघून होत नाही. मात्र सरकार जाती-धर्माच्या आधारावर करोना रुग्णांची माहिती घेत आहे. काही जणांकडून असे चुकीच्या पद्धतीने वृत्तांकन केलं जात आहे. हे अतिशय चुकीचे आहे, असं सांगत अग्रवाल यांनी आरोप फेटाळून लावले.
आरोग्य सेतू , डेटाची पूर्ण काळजी घेतली जात आहे…
दरम्यान, आतापर्यंत ९.८ कोटी नागरिकांनी आरोग्य सेतू अॅप डाऊनलोड केले आहे. हे अॅप आता उद्यापासून जिओच्या स्मार्टफोनवरही उपलब्ध होईल. यासोबतच नागरिकांचा डेटा सुरक्षिततेच्या मुद्द्यावर पूर्ण काळजी घेतली जातेय आणि याबाबत कुठलीही तडजोड केली जाणार नाही, अशी माहिती एम्पॉवर्ड ग्रुपचे अध्यक्ष अजय सहानी यांनी दिली. वंदे भारत मोहीमेनुसार आतापर्यंत २३ उड्डाणांद्वारे ४ हजार भारतीयांना मायदेशात आणण्यात आलं आहे. तर ४६८ विशेष ट्रेनद्वारे ५ लाख स्थलांतरीत मजुरांना त्यांच्या गावी सोडण्यात आलं आहे. रविवारी काल एका दिवसात १०१ विशेष ट्रेन चालवण्यात आल्या, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्रालयाच्या सहसचिव पुण्य सलिला श्रीवास्तव यांनी दिली.