#CoronaVirusEffect : भारतीय लोकांना “ती” आवडते आणि “तिला” कोरोनाच्या दृष्टीने अमेरिकाच सेफ वाटतो…म्हणून तिने सोडला भारत !!

https://www.instagram.com/p/CACPBLSjXIT/
सगळीकडे कोरोनाची चर्चा सुरु असली तरी या चर्चेतून बाहेर उडी घेताना सर्वाधिक चर्चेतला अभिनेत्री सनी लिओनी हिने मुंबईतून थेट अमेरिका गाठली आहे. विशेष म्हणजे अमेरिका, इटली, युनायटेड किंगडम, फ्रान्स, स्पेन सारख्या विकसीत देशांतही लाखो जण मृत्युमुखी पडले असले तरी भारतात राहून नाव आणि पैसे कमावलेल्या सनीला कोरोना व्हायरसपासून वाचण्यासाठी भारतापेक्षा अमेरिका अधिक सुरक्षित असल्याचं म्हटलं आहे तिच्या म्हणण्यानुसार तिच्या मुलांच्या दृष्टीनं अमेरिकाच सुरक्षित आहे, त्यामुळं आम्ही इथं आलो आहोत असं तिनं इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करून सांगितलं आहे.
दरम्यान मुंबईतील करोनाची स्थिती पाहता सनी लिओनी तिचा पती डॅनिअल वेबर यांनी त्यांच्या तीन मुलांसह लॉकडाऊन काळात भारत सोडला आहे. त्यांनी त्यांच्या अमेरिकेतल्या लॉस एंजिलिसमधल्या बंगल्यावर राहणं पसंत केलं आहे. भारतातील परिस्थिती पाहता माझ्या मुलांचा विचार करून आम्ही अमेरिकेत येण्याचा निर्णय घेतला असं तिनं तिच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटलं आहे. सनीच्या पतीनं देखील एक फोटो शेअर करत ‘क्वारंटाईन पार्ट २; हे इतकं काही वाईट नाही’, असं कॅप्शनही दिलं आहे. सनीम आणि तिचा पती डॅनिअल वेबर हे अमेरिकेचे अधिकृत नागरिक असून २०१२ पासून सनी मुंबईत राहत आहे. तिच्या या कृतीमुळे तिच्या भारतीय चाहत्यांच्या तीव्र प्रतिक्रिया येणार हे मात्र नक्की .