AurangbadNewsUpdate : स्थानिक स्वराज्य संस्थेतील कर्मचाऱ्यांना तत्काळ सुरक्षात्मक साधने पुरविण्याचे खंडपीठाचे आदेश

आैरंगाबाद: महाराष्ट्र राज्यातील नगरपरिषद, नगरपंचायत व महानगरपालिका मधील सर्वच कर्मचारी यांना जीवन विमा लागू करणे व अत्यावश्यक सुरक्षात्मक साहित्य पुरविण्यासंबंधी मुंबई उच्च न्यायालयाच्या आैरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली हाेती. आैरंगाबाद खंडपीठाचे न्या. रवींद्र घुगे यांनी सुरक्षात्मक साधणे तत्काळ पुरविण्यासंबंधीचे आदेश दिले आहेत. खंडपीठाच्या निर्णयामुळे माेठा दिलासा संबंधित कर्मचाऱ्यांना मिळाला आहे.
महाराष्ट्र राज्य नगरपरिषद नगरपंचायत व संवर्ग कर्मचारी संघटना यांचे वतीने औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली हाेती. नगरपरिषद, नगरपंचायत व महानगरपालिका कर्मचाऱ्यांना कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी सुरक्षात्मक साधने उपलब्ध करण्यात यावी. तसेच नगर परिषद नगरपंचायत मधील सफाई कर्मचारी पासून सर्व कर्मचारी यांना जीवन विमा योजना लागू करावी अशी विनंती रिट याचिकेत करण्यात आलेली आहे. या याचिकेवर खंडपीठात सुनावणी झाली. यामध्ये नगरपरिषद नगरपंचायत व महानगरपालिका सर्व कर्मचाऱ्यांना तात्काळ सुरक्षात्मक साहित्य उपलब्ध करून देण्याबाबत आदेश दिले आहेत. तसेच नगर परिषद नगरपंचायत व महानगरपालिका सर्व कर्मचाऱ्यांना जीवन विमा लागू करण्यासंबंधी महाराष्ट्र शासनाचे नगर विकास सचिव यांना सदर प्रकरणी १८ मे २०२० रोजी सविस्तर म्हणणे सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. संघटनेच्या वतीने अॅड. अमित श्रीकांत देशपांडे यांनी काम पाहिले.