Aurangabad NewsUpdate : शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ई- पाससाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

भारत सरकार आणि महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार 20 एप्रिल पासून सर्व शासकीय कार्यालये, सार्वजनिक क्षेत्रातील संस्था, स्थानिक संस्था कार्यालये, निम सरकारी संस्था यांना मर्यादित मनुष्यबळासह काम करण्याचे आदेश आहेत.
20 एप्रिलपासून किंवा लॉकडाऊन कालावधी दरम्यान विभाग प्रमुखांनी परवानगी दिलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी उपास्थित राहायचे आहे. अशा परवानगी दिलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कार्यालयात येण्या आणि जाण्यासाठी पासची आवश्यकता आहे. हा पास मिळविण्यासाठी epassabad.in या पोर्टलवर ऑनलाईन अर्ज सादर करता येईल. चौकशीनंतर देण्यात आलेला पास पोलिसांनी मागितला तर तो सादर करावा. केवळ कार्यालय प्रमुखांनी अधिकृत केलेल्या कर्मचार्यांना अर्ज करणे आवश्यक असणार आहे, अर्ज करताना अधिकृतता पत्र सादर करणे आवश्यक आहे, याची नोंद घ्यावी. तरी सर्व कर्मचाऱ्यांनी मास्क वापरणे बंधनकारक असून लॉक डाउन आदेशाचे तंतोतंत पालन करावे.