Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

महाराष्ट्र : आनंद तेलतुंबडे यांना २५ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी

Spread the love

भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरणी अटकेत असलेल्या प्राध्यापक आनंद तेलतुंबडे यांच्या कोठडीत आठवड्याभराची वाढ करण्यात आली आहे.आज त्यांची संपत असल्यानं तेलतुंबडे यांना मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए कोर्टात हजर करण्यात आल्यानंतर  पुढील तपासाकरता तेलतुंबडेंची पोलीस कोठडी आठवड्याभरासाठी वाढवून मागण्यात आली. कोर्टानं ही विनंती मान्य करत प्राध्यापक आनंद तेलतुंबडे यांना २५ एप्रिलपर्यंत एनआयए कोठडीतच ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.

आनंद तेलतुंबडे यांच्या अटकेसाठी सर्वोच्च न्यायालयानं दिलेली मुदत संपताच त्यांनी  गेल्या मंगळवारी मुंबईतील एनआयए मुख्यालयात तपासयंत्रणेपुढे स्वतः अटक करून घेतली.  त्यानंतर एनआयएने  त्यांना अटक केली होती. माओवादी तसेच दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याच्या संशयावरून वादाच्या भोवऱ्यात अडकलेले सामाजिक कार्यकर्ते गौतम नवलखा आणि प्राध्यापक आनंद तेलतुंबडे यांना अटकपूर्व जामीन देण्यास हायकोर्टानं १४ फेब्रुवारी 2020 रोजी नकार दिला होता. या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी अवधी मिळावा याकरता दोघांना चार आठवड्यांसाठी अटकेपासून दिलासा दिला होता. मात्र सर्वोच्च न्यायालयानंही या दोघांचं अपील फेटाळून लावत त्यांना १४ एप्रिलपर्यंत तपासयंत्रणेपुढे शरण होण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार त्यांनी १४ एप्रिल हि तारीख निवडली. तर गौतम नवलखा हे दिल्लीत एनआयएपुढे शरण आले असून त्यांना दिल्लीत अटक करण्यात आली आहे.

दरम्यान शहरी नक्षलवाद आणि भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी गौतम नवलखा आणि आनंद तेलतुंबडे या दोघांविरोधात पुणे पोलिसांनी दाखल केलेली कागदपत्रे ही तपासलेली नाहीत. तसेच पुणे पोलिसांनी अद्याप त्यांचा यासंदर्भात दोघांचा साधा जबाबदेखील नोंदवलेला नाही. मुळात याप्रकरणाशी यांचा काहीही संबंधच नाही असा युक्तिवाद दोघांच्यावतीने कोर्टात केला गेला. गौतम नवलखा हे काश्मिरमध्ये सत्य शोधन समितीच्यावतीने गेले होते. तेव्हा तिथं त्यांचा हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेशी संपर्क आला होता. मात्र हा आरोप बिनबुडाचा असून नवलखा हे सरकारच्यावतीने शांतता दूत म्हणून काम पाहत होते. त्यामुळे ते माओवाद्यांमध्ये फारसे प्रसिद्ध नव्हते असाही दावा कोर्टात करण्यात आला होता. मात्र हे दोघेही एल्गार परिषदेशी संबंधित असून भीमा-कोरेगाव प्रकरणात यांच्या सहभागाबाबतही अनेक पुरावे उपलब्ध आहेत. त्याबाबत चौकशी आणि अधिक तपास सुरू असल्य्यामुळे त्यांचा ताबा मिळवून अधिक चौकशी गरजेची असल्याचे एनआयएने  कोर्टात सांगितले.

शहरी नक्षलवाद प्रकरणी अटकेत असलेल्या रोना विल्सन आणि सुरेंद्र गडलिंग या इतर आरोपींकडून जम्मू-काश्मीरमधील फुटीरतावाद्यांशी संबंध जोडलेली अनेक कागदपत्र जप्त केली आहेत. त्यात या सर्व आरोपींनी हिजबुल मुजाहिद्दीनशी संबंध कसे ठेवले आहेत याचा उल्लेखही या कागदपत्रातून करण्यात आला असल्याचा तपासयंत्रणेचा दावा आहे. तसेच आनंद तेलतुंबडे हे प्रतिबंधित नक्षलवादी संघटनेचे सक्रिय सदस्य असून अशा संस्थांमध्ये लोकांची भरती करणे आणि या संस्थांसाठी निधी गोळा करण्याचे कामही ते पाहत असल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!