कोविड-19 मुख्यमंत्री सहाय्यता निधी मध्ये २४५ कोटींची मदत

मुख्यमंत्री सहाय्यता निधी- कोविड-19 । बँक: स्टेट बँक ऑफ इंडिया । बचत खाते क्रमांक 39239591720
महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांना मदत करण्यासाठी आणि कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी केंद्र सरकारसह राज्य सरकार सर्वोतोपरी प्रयत्न करत आहेत. या पार्श्वभूमीवर केल्या जाणाऱ्या उपाययोजनांसह व्यवस्थांसाठी येणाऱ्या खर्चात जर कोणाला मदत करण्याची इच्छा असेल तर त्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये योगदान देण्याचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनानुसार कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना पाठबळ म्हणून मुख्यमंत्री सहायता निधीच्या स्वतंत्र बँक खात्यात निधीचा ओघ सुरू आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक दानशूर व्यक्ती आणि संस्थांनी लाखो रुपयांचं योगदान यासाठी दिलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्री सहायता निधीत आतापर्यंत २४५ कोटी रुपये जमा झाले असल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आलेली आहे.
Till now, Maharashtra CM COVID19 Relief Fund has received contributions of Rs 245 Crores: Maharashtra Chief Minister's Office
— ANI (@ANI) April 16, 2020