Aurangabad NewsUpdate : कोरोना रुग्णावर उपचार करणारे खासगी हॉस्पिटल १४ दिवसांसाठी झाले बंद…

औरंगाबाद येथील जसवंतपुरा, सेंट्रल नाका रोड स्थित सहारा हॉस्पीटल १४ दिवसांसाठी बंद ठेवण्याचे आदेश औरंगाबाद महानगरपालिका तर्फे देण्यात आल्याची माहिती मनपा आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ नीता पाडळकर यांनी दिली. सदरील हॉस्पिटलमध्ये बिस्मिल्ला कॉलोनी येथे आढळून आलेल्या एका कोरोना संक्रमित रुग्णाचे उपचार करण्यात आले होते. याची दखल घेऊन हॉस्पिटल आज पासून १४ दिवस बंद ठेवण्याची नोटीस सहारा हॉस्पिटल प्रशासनास देण्यात आली. नोटिसाची अमलबजावणी करता आज पासून सहारा हॉस्पिटल पुढच्या १४ दिवसांसाठी बंद करण्यात आले आहे, डॉ पाडळकर म्हणाल्या.
मिनी घाटीतल्या १३१ रुग्णांची कोविड तपासणी निगेटिव्ह; आज १०२ जणांची तपासणी
औरंगाबाद जिल्हा सामान्य रुग्णालयात (मिनी घाटी) आज १०२ रुग्णांची तपासणी करण्यात आली. तर काल आणि आजचे मिळून रुग्णालयात दाखल झालेल्या १३१ रूग्णांची कोविड तपासणी निगेटिव्ह आली, त्यांना आज आवश्यक औषधींचा सल्ला देऊन घरी पाठवल्याचे रुग्णालयाचे डॉ. प्रदीप कुलकर्णी म्हणाले.
१९ (कोरोना) संसर्गामुळे औरंगाबाद जिल्ह्यात आजपर्यंत २८ कोरोनाबाधित रुग्ण आढळले. (दोन रुग्णाचा मृत्यू झालेला आहे व दोन रुग्ण बरे झाल्यामुळे डिस्चार्ज देण्यात आले आहे) जिल्हा सामान्य रुग्णालयात (मिनी घाटी) २२, शासकीय वैद्यकीय रुग्णालयात (घाटी) एक आणि खासगी रुग्णालयात एक अशा एकूण २४ कोरोनाबाधित रुग्णांवर विलगीकरण कक्षात उपचार सुरू आहेत.
मिनी घाटीत आज तपासण्यात आलेल्यांपैकी ५२ जणांच्या लाळेचे नमुने शासकीय वैद्यकीय रुग्णालय व महाविद्यालय (घाटी) येथे पाठवले होते. तसेच १४ दिवस पूर्ण करणाऱ्या ०९ कोविड रुग्णांचेही लाळेचे नमुने घेण्यात आलेले आहेत. सध्या रुग्णालयात १९ जणांना भरती करून देखरेखीखाली ठेवलेले आहे. तर २३ जणांना घरीच अलगीकरणात राहण्याचा सल्ला दिलेला आहे, असे डॉ. कुलकर्णी म्हणाले.
घाटीत ३२ रुग्णांवर उपचार सुरू
आजपर्यंत घाटीत ३२ रुग्ण भरती आहेत. त्यामध्ये संशयित कोविड ११ रुग्ण, कोविड-१९ निगेटिव्ह २० आणि एका पॉझिटिव्ह (वर उल्लेख असलेल्या) रुग्णाचा समावेश आहे. घाटीत आज २५ रुग्णांची तपासणी करण्यात आली. १० जणांच्या लाळेचे नमुने तपासणी अहवाल येणे बाकी आहेत, असे डॉ. अरविंद गायकवाड यांनी सांगितले.
आता पर्यंत ४१७ नागरिकांना दंड २ लाखाचा वर दंड वसूल
औरगाबाद शहरामध्ये सार्वजनिक ठिकाणावर मास्क न लावता फिरणाऱ्या नागरिकांवर औरंगाबाद महापालिकेची कारवाई सतत सुरू असून आज सलग पांचव्या दिवशी एकूण ७६ नागरिकांवर कारवाई करून प्रत्येकी ५०० रुपये प्रमाणे ३८,००० रुपये दंड आकारण्यात आले. सदरील कारवाई मनपा आयुक्त मा श्री आस्तिक कुमार पांडये यांच्या आदेशानुसार आणि अतिरिक्त आयुक्त रवींद्र निकम यांच्या मार्गदर्शनाखाली घनकचरा व्यवस्थापन कक्ष प्रमुख नंदकिशोर भोंबे यांच्या निग्रणीत नागरिक मित्र पथक चे कर्मचारी आणि वॉर्ड अधिकारी यांच्या समनव्यांनी एकूण ०९ प्रभागात पार पाडण्यात आली. या कारवाई अंतर्गत आता पर्यंत ४१७ नागरिकांवर कारवाई करून एकूण २८५०० रुपय दंड आकारण्यात आले आहेत.