#CoronaVirusUpdate : जाणून घ्या महाराष्ट्रातील कोणते जिल्हे कोणत्या झोनमध्ये ?

कोरोना रुग्णांच्या संख्येनुसार केंद्र सरकारने देशातील जिल्ह्यांना तीन झोन मध्ये विभागले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या सहसचिव प्रीती सुदन यांनी बुधवारी कोरोनाच्या हॉटस्पॉट्स झोन मध्ये आलेल्या जिल्ह्यांची यादी जाहीर केली. या यादीत महाराष्ट्रातील ११ जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे. याशिवाय कोरोनाचे कमीत कमी १५ रुग्ण रुग्ण असलेल्या तीन जिल्ह्यांचा हॉटस्पॉट क्लस्टर मध्ये समावेश करण्यात आला आहे. या माध्यमातून केंद्र व राज्य सरकारने कोरोना व्हायरस ग्रस्तांचा योग्य पद्धतीने उपचार व्हावा हे उद्दिष्ट्य ठेवले आहे.
महाराष्ट्राच्या ११ हॉटस्पॉट जिल्ह्यात २० एप्रिलनंतर देखील लॉकडाऊनचे निर्बंध लागू राहण्याची शक्यता आहे. यामध्ये
मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पुणे, नाशिक, सांगली, अहमदनगर, नागपूर, यवतमाळ, औरंगाबाद, बुलढाणा
कल्स्टरसह हॉटस्पॉट जिल्हे
कोरोनाव्हायरसचे किमान १५ रुग्ण असलेल्या जिल्ह्यांना या झोनमध्ये ठेवण्यात आले असून यामध्ये
कोल्हापूर, पालघर, अमरावतीचा समावेश आहे.
या जिल्ह्यांमध्ये रुग्ण वाढू नये, असे उद्दिष्ट्य ठेवण्यात आले असून जे रुग्ण आहेत त्यांना लवकर कसं बरं करता येईल याकडे राज्य व केंद्र सरकारचं लक्ष राहणार आहे.
नॉन-हॉटस्पॉट जिल्हे
लातूर, सातारा, रत्नागिरी, उस्मानाबाद, जळगाव, सिंधुदूर्ग, रायगड, बीड, हिंगोली, जालना, धुळे, सोलापूर, अकोला, वाशिम, गोंदिया
या जिल्ह्यांचा समावेश नॉन-हॉटस्पॉट मध्ये करण्यात आले आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव या जिल्ह्यांना होऊ नये अशी काळजी घेण्यात येत आहे. आगामी २० एप्रिलनंतर या जिल्ह्यात अनेक सुविधा सुरू होण्याची शक्यता आहे.