#CoronaVirusEffect : तबलिगी जमातीचे धर्मगुरू मौलाना साद यांच्यावर सदोष मनुष्य वाढच गुन्हा

दिल्लीतील तबलिगी जमातचे प्रमुख मौलाना साद यांच्या अडचणी वाढल्या आहेत. दिल्ली पोलिसांनी त्यांच्यावर आणखी नवं कलम लावलं आहे. सदोष मनुष्यवधाचा गुन्हा त्यांच्यावर दाखल करण्यात आला आहे. मरकजमध्ये गर्दी जमवून नियमांच उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्यावर आधीच गुन्हे दाखल करण्यात आले होते. अशा प्रकारचं वृत्त ‘टाईम्स ऑफ इंडिया’ने दिलं आहे. मौलाना साद यांच्या दोन नातेवाईकांना कोरोना झाला आहे. त्यांचे रिपोर्ट्स पॉझिटिव्ह आल्याचंही सांगितलं जात आहे. हे नातेवाईक उत्तर प्रदेशातून दिल्लीत मरकजमध्ये आले होते. दरम्यान हे लोक कार्यक्रमानंतर आपापल्या गावी देशभर गेले त्यामुळे झपाट्याने कोरोना देशभर पसरला घटनेच्या त्या दिवसांपासून साद हे बेपत्ता असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. मार्च महिन्यात दिल्लीतल्या निजामुद्दीनमध्ये झालेल्या कार्यक्रमात देश विदेशातून हजारो लोक जमले होते. देशभर लॉकडाऊनची स्थिती असताना एवढ्या लोकांना मशिदीत ठेवल्यामुळे देशभर वादळ निर्माण झालं होतं. या कार्यक्रमाला अनेक देशांमधून प्रचारक आल्याने तिथे असलेल्या अनेकांना कोरोनाची लागण झाली.