#CoronaVirusEffect : काँग्रेसनेत्या सोनिया गांधी यांनीही साधला देशवासीयांशी संवाद, सोशल डिस्टन्सिंग पाळण्याची गरज केली अधोरेखित…

काँग्रेसच्या नेत्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांशी संवाद साधण्याआधी देशवासियांना संबोधित केलं. यावेळी सोनिया गांधींनी करोनाविरोधातील लढाईत दिवसरात्र मेहनत करणाऱ्या डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, पोलीस यांचं कौतुक केलं आहे. सोनिया गांधींनी यावेळी लोकांना लॉकडाउन तसंच सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन करण्याचं आवाहनही केलं. काँग्रेसकडून सोनिया गांधींचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.
सोनिया गांधी यांनी पुढे म्हणाल्या कि , “आपण सर्वजण एकत्र मिळून करोनाची लढाई लढणं यापेक्षा मोठी देशभक्ती काय असू शकते. सुरक्षा उपकरणांची कमतरता असतानाही आपले योद्धा करानाविरोधातील युद्ध लढत आहेत. डॉक्टर, आरोग्य कर्मचारी स्वसंरक्षण ड्रेस नसतानाही रुग्णांवर उपचार करत आहेत,” यावेळी त्यांनी लोकांना लॉकडाउनच्या नियमांचं काटेकोरपणे पालन करण्याचं आहन केलं.
कांग्रेस अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी का देश के नाम संदेश:-
कोरोना संकट में डॉक्टर्स, सफाईकर्मियों, पुलिस सहित सरकारी अधिकारियों के डटे रहने से बड़ी "देशभक्ति" कोई नहीं है। हम एकता, अनुशासन और आत्मबल के भाव से कोरोना को परास्त करेंगे। धैर्य एवं संयम के लिए देशवासियों का धन्यवाद। pic.twitter.com/Sl4zkKURTv— Congress (@INCIndia) April 14, 2020
“लॉकडाउन यशस्वी व्हावा यासाठी पोलीस आणि जवान कर्तव्य निभावत आहेत. स्वच्छता कामगार अनेक सुविधा नसतानाही विषाणूंचा फैलाव रोखण्यासाठी मदत करत आहेत. सरकारी कर्मचारीदेखील महत्त्वाच्या सेवा सुरु राहाव्यात यासाठी मेहनत करत आहेत. पण जर आपण त्यांना पाठिंबा दिला नाही तर ते त्यांचं काम योग्य रितीने करु शकणार नाहीत. डॉक्टरांवर हल्ला केल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत, हे चुकीचं आहे. ही आपली संस्कृती नाही. या लढाईत आपण त्यांना पाठिंबा दिला पाहिजे,” असं सोनिया गांधी यांनी म्हटलं आहे. “तुमच्यापैकी अनेकजण सॅनिटायझर, रेशनचं वाटप करत वैयक्तिक स्तरावर मदत करत आहात. तुम्ही सर्वजण कौतुकास पात्र आहात. आम्ही राज्यात सत्तेत असो किंवा विरोधात पण या लढाईत सर्व काँग्रेस कार्यकर्ते तुमच्यासोबत आहेत,” असं यावेळी त्यांनी सांगितलं. संकटाच्या या कालात शांती, धैर्य आणि संयम राखण्यासाठी सोनिया गांधी यांनी जनतेचे आभार मानले. सोशल डिस्टन्सिंग पाळण्याची गरज त्यांनी यावेळी अधोरेखित केली.