देश : थरारक !! कर्फ्यू पास विचारल्याने निहंग शीखांनी पोलीस अधिकाऱ्याचा होताच कलम केला ….

देशात सगळीकडे रस्त्यावरच्या लोकांना आवरणे पोलिसांसमोरील मोठे आव्हान आहे . परिणामी या लोकांना रोखताना पोलिसांना जीव धोक्यात घालून काम करावे लागत आहे. अशा घटना सर्वत्र घडत असून पंजाबमधील पतियाळात निहंग शीखांनी त्यांना कर्फ्यू पास विचारल्याचा राग आल्याने एका पोलिसावर हल्ला करत त्याचा हात पूर्णपणे कापल्याचे वृत्त आहे. या पोलिसांवर शस्त्रक्रिया चालू असून पोलीस पोलीस गुरुद्वाऱ्यात लपून बसलेल्या आरोपींच्या अटकेसाठी प्रयत्न करीत आहेत. आज रविवारी सकाळी भाजी बाजाराच्या मुख्य गेटवर शीखांनी पोलिसांवर हल्ला केला. या हल्ल्यात इतरही पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत.
उपलब्ध माहितीनुसार हरजीत सिंग असे शीखांच्या हल्ल्यात हात कापण्यात आलेल्या सहायक पोलिस उपनिरीक्षकाचे नाव आहे. या हल्ल्यात हरजीत सिंग यांचा हात कापला गेल्याचे पंजाबचे पोलिस महासंचालक दिनकर गुप्ता यांनी सांगितले. हरजीत सिंग यांना चंदीगड पीजीआयमध्ये दाखल करण्यात आले आहे. या हल्ल्यात पोलिस कर्मचाऱ्याशिवाय बाजाराच्या बोर्डाचे अधिकारीही जखमी झाले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी ७ लोकांना ताब्यात घेतले आहे. निहंग शीख एका कारमधून प्रवास करत होते. मात्र, रस्त्यावर बॅरिकेड्स लावलेले असतानाही निहंग शीखांना भाजी बाजारात जायचेच होते. पोलिसांनी त्यांच्याकडे कर्फ्यू पास दाखवण्यास सांगितले. मात्र, पास न दाखलता निहंग शिखांनी बॅरिकेड्सला ठोकर मारली आणि बॅरिकेड्स तोडून टाकले. त्यानंतर बाहेर येत त्यांनी ड्युटीवर असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांवर सशस्त्र हल्ला केला, अशी माहिती पतियाळाचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक मनदीप सिंग सिद्धू यांनी माहिती देताना सांगितले.