#CoronaVirusUpdate : गेल्या २४ तासांमध्ये देशात ९१८ जणांना कोरोना तर ३१ जणांचा मृत्यू , एकूण रुग्णांची संख्या ८४४७ : लव अग्रवाल

As per 9th April data, if we needed 1,100 beds we had 85,000 beds. Today when we need 1,671 beds, then we have 1 lakh 5 thousand beds in the dedicated 601 #COVID hospitals: Lav Aggarwal, Joint Secretary, Union Health Ministry https://t.co/sB7wqfHea1 pic.twitter.com/OplUFXTVjL
— ANI (@ANI) April 12, 2020
देशभरात गेल्या २४ तासांमध्ये देशात ९१८ कोरोना रुग्णांची भर पडली आहे. तर ३१ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे देशातल्या कोरोनाग्रस्तांची संख्या आता ८४४७ वर गेली आहे. २९ मार्चला ही संख्या फक्त ९७९ एवढी होती. यातल्या २० टक्के रुग्णांना आयसीयू मध्ये ठेवण्यात आलं आहे. त्यात १६७१ रुग्णांना ऑक्सिजन द्यावा लागत असून त्यातल्या अनेकांची प्रकृती क्रिटिकल असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव लव अग्रवाल यांनी दिली. सध्या आपल्याला १६७१ एवढ्या बेड्सची गरज असताना आपल्याकडे १ लाख ५ हजार बेड्स तयार आहेत अशी माहितीही त्यांनी दिली. सोशल डिस्टन्सिंगशिवाय कोरोनावर दुसरा उपाय नाही असंही ते म्हणाले.
पुण्यातल्या रुबी हॉल हॉस्पिटलमध्ये एक ४५ वर्षांची नर्स कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली आहे. त्यामुळे त्यांच्या संपर्कात आलेल्या ३० नर्सना क्वारंटाइन करण्यात आलं आहे. अशी माहिती हॉस्पिटलच्या मेडिकल सर्व्हिस विभागाचे संचालक संजय पाठारे यांनी दिलीय. काही दिवसांपूर्वीच त्या सुट्टीहून परतल्या होत्या. त्यानंतर त्यांनी एका कोरोना रुग्णावर उपचारही केले होते. त्यानंतर त्यांना सौम्य लक्षणे दिसायला लागली होती. त्यामुळे त्यांची टेस्ट करण्यात आली आणि ती पॉझिटिव्ह निघाली अशी माहितीही त्यांनी दिली. महाराष्ट्रात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. गेल्या २४ तासांमध्ये राज्यात तब्बल १३४ रुग्णांची संख्या वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे. यापैकी ११३ रुग्ण हे मुंबईतच आढळले आहे.
महाराष्ट्राला कोरोना व्हायरसने घातलेला विळखा वाढतच चालला आहे. राज्यात आतापर्यंत कोरोनाबाधितांची संख्याही १८९५ वर पोहोचली आहे. गेल्या २४ तासात मुंबई, पुणे, मीरा भाईंदर, नवी मुंबई, ठाणे आणि वसई विरारमध्ये कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहे. कोरोनाचं हॉटस्पॉट बनलेल्या मुंबईत ११३ रुग्ण आढळले आहे. वरळी, कोळीवाडा, धारावी आणि उपनगरात नवे रुग्ण आढळले आहे. वसई आणि विरारनंतर आता मीरा भाईंदरमध्येही रुग्णांची संख्या वाढली आहे. आज सकाळपर्यंत मीरा भाईंदरमध्ये ७ नवे रुग्ण आढळले आहे. तर पुण्यात ४ रुग्ण आढळून आले. नवी मुंबई, ठाणे महापालिका, वसई विरार इथं प्रतेकी २ रूग्णांची वाढ झाली आहे. तर रायगड, अमरावती, भिवंडीमध्ये प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे.
देशभरात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. महाराष्ट्रात रुग्णसंख्या ही १७६१ म्हणजेच दोन हजाराच्या जवळपास जाऊन ठेवली आहे. राज्य सरकारच्या म्हणण्याप्रमाणे महाराष्ट्रातल्या एकूण रुग्ण संख्या पैकी ९१% रुग्ण हे मुंबई, एम एम आर रिजन आणि पुणे येथील आहेत. महाराष्ट्र राज्य वैद्यकीय शिक्षण आणि औषध विभाग यांच्यावतीने जारी करण्यात आलेल्या एका माहितीनुसार राज्यात १२ एप्रिल सकाळी दहा वाजेपर्यंत १७६१ रुग्ण आहेत तर भारतात रुग्णांची संख्या ८३५६ इतकी आहे.