#CoronaVirusEffect : Maharashtra Update : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची महाराष्ट्रासाठी लॉकडाऊनचा कालावधी वाढविण्याची सूचना….

पंतप्रधान नरेंद्र मोदी कोरोना व्हायरसचा देशात वेगानं वाढत असलेला संसर्ग रोखण्यासाठी आज पुन्हा मोठी घोषणा कऱण्याची शक्यता आहे. १४ एप्रिलपर्यंत देशभरात लॉकडाऊनचे आदेश देण्यात आले होते. मात्र राज्यातील स्थितीवरही प्रत्येक राज्य पंतप्रधानांसोबत चर्चा करून निर्णय घेत असल्याचं पाहायला मिळत आहे. पण लॉकडाऊन वाढवण्यासाठी महाराष्ट्र राज्य आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे तयार असल्याचं सांगण्यात येत आहेत. देशात कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्व मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा केली. या परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी राज्यांकडून त्यांनी सूचनाही मागवल्या तसेच मी तुमच्यासाठी २४ X ७ उपलब्ध असल्याचंही यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितलं. या बैठकीत आरोग्य मंत्रालयानं करोना व्हायरसच्या फैलावाचा तपशीलासहीत एक प्रेझेन्टेशनही दिलं. या बैठकीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊन वाढवण्याची मागणी केली असल्याचे वृत्त आहे.
दरम्यान कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २४ मार्च रोजी देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा केली होती. २१ दिवसांच्या लॉकडाऊनचा आज १८ वा दिवस आहे. उल्लेखनीय म्हणजे, देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आल्यानंतरही करोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याचं दिसून आलं आहे. देशातील करोनाबाधितांची संख्या ७४४७ वर पोहचली आहे. यामध्ये ७१ परदेशी नागरिकांचा समावेश आहे. तर आत्तापर्यंत देशातील २३९ जणांना करोनामुळे प्राण गमवावे लागले आहेत. दरम्यान, दिलासादायक बाब म्हणजे ६४३ जणांनी करोनावर यशस्वीरित्या मात केलीय. त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलाय. महाराष्ट्रात कोरोनाचा वाढता फैलाव पाहता लॉकडाऊन पुढे 30 एप्रिलपर्यंत वाढवावा अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. महाराष्ट्रातील वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळाने लॉकडाऊन उठवण्याची चिंता व्यक्त केली होती. उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांसमवेत चिंता व्यक्त केली. यावर आवर घालण्यासाठी 30 एप्रिलपर्यंत वाढावा अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
Delhi: Prime Minister Narendra Modi holds a meeting via video-conferencing with the Chief Ministers over #COVID19. pic.twitter.com/yd6mdCzukr
— ANI (@ANI) April 11, 2020
सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत व्हिडिओ कॉन्फ्रेसिंगमध्ये सीएम उद्धव ठाकरे, गृहमंत्री अनिल देशमुख, आरोग्य मंत्री राजेश टोपे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मुख्य सचिव आणि डीजीही उपस्थित आहेत. यामध्ये मुंबई – एमएमआर जीरण, पुणे आणि काही बाधित भागासाठी मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन ३० एप्रिलपर्यंत वाढविण्याची विनंती केली आहे. महाराष्ट्रात देशातील सर्वाधित १३६४ करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यातील ९७ जणांचा मृत्यू झालाय. दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही ‘परिस्थिती अद्यापही नियंत्रणात आलेली नसल्यानं लॉकडाऊनचा कालावधी कमीत कमी ३० एप्रिलपर्यंत वाढवण्यात यावा’, अशी मागणी केलीय. दिल्लीतही ९०३ करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. शुक्रवारी एकाच दिवशी १८३ रुग्ण सापडले. त्यामुळे, दिल्लीतील अनेक भागांना ‘संक्रमित झोन’ म्हणून घोषित करण्यात आलं आहे.
ओडिसा आणि त्यापाठोपाठ पंजाबनेही १ मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी आणि लॉकडाऊनसंदर्भात बोलण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांसोबत सकाळी ११ वाजल्यापासून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा सुरू आहे. शुक्रवारी मुंबईतून १३२ नवीन रुग्ण आढळले. त्यानंतर मुंबईतील एकूण रुग्णांची संख्या १००८ वर पोहचलीय. मुंबईत शुक्रवारपर्यंत १० जणांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी भारतात करोनाची तब्बल ८५९ नवीन रुग्ण दाखल झाले आहेत. हा करोना संक्रमणाचा एका दिवसाचा सर्वात मोठा आकडा ठरलाय.
कोरोना आणि इतर महत्वाच्या बातम्या….
आयसीएमआर ने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री ९ वाजेपर्यंत १,४७,०३४ रुग्णांच्या १,६१,३३० सॅम्पल्सची तपासणी करण्यात आली. त्यातील एकूण ६८७२ व्यक्ती करोना पॉझिटिव्ह आढळल्या आहेत. उल्लेखनीय म्हणजे, शुक्रवारी एकाच दिवश १५,६६३ तपासण्या पार पडल्या त्यातील ४३३ जण करोना पॉझिटिव्ह आढळले.
दिल्लीतील करोना कन्टेनमेंट झोन वाढवून ३० करण्यात आले आहेत. शुक्रवारी यात आणखी सहा भागांची भर पडली. यामध्ये, नबी करीम, जीटीबी एन्क्लेव्ह, झाकिर नगर, अबू बकर भागाचाही समावेश आहे.
अमेरिका हा जगातील पहिला देश ठरलाय जिथं करोना व्हायरसमुळे एकाच दिवशी २००० हून अधिक मृत्यूंची नोंद झालीय. ‘जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटी’नं दिलेल्या माहितीनुसार गेल्या २४ तासांत अमेरिकेत २१०८ जणांचा मृत्यू झाला आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त १४ एप्रिलला सुट्टी जाहीर, केंद्र सरकारची माहिती. देशभरातील सर्व सरकारी कार्यालयं आणि औद्योगिक कंपन्यांचा समावेश
अमेरिकेत आत्तापर्यंत १८,५८६ जणांचा मृत्यू झालायत तर देशात आत्तापर्यंत करोनाबाधितांचा आकडा ५ लाखांपर्यंत पोहचला आहे.
राज्यातील करोनाबाधितांचा आकडा १६६६ वर
नव्यानं नोंद झालेल्या रुग्णांमध्ये मुंबईतील ७२ रुग्णांचा समावेश
राज्यातील करोनाबाधितांचा आकडा १६६६ वर पोहोचला; आणखी ९२ रुग्ण वाढले
कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये ५४ वर्षीय करोनाबाधिताचा मृत्यू; श्वसनसंस्थेत जंतूसंसर्ग झाल्याची जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांची माहिती
पंतप्रधान मोदी यांची राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसमवेत व्हिडिओ कॉन्फरन्स… वर्षा निवासस्थानाहून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सहभागी. गृहमंत्री अनिल देशमुख, आरोग्यमंत्री राजेश टोपे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हेही उपस्थित
नागपूरमध्ये आणखी दोघांना करोनाची लागण
अकोला: सर्वोपचार रुग्णालयात दाखल पातूर येथील एका कोरोनाबाधित रुग्णाचा आत्महत्येचा प्रयत्न
मालेगावात करोनाचा विळखा वाढत आहे. शनिवारी सकाळी मालेगावातील रहिवासी असलेल्या करोना बाधित तरुणीचा धुळे येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. करोनामुळे आतापर्यंत मालेगावतील दोन जणांचे मृत्यू झाले असून करोना बधितांची संख्या नऊ झाली आहे.