Aurangabad News Update : औरंगाबाद शहर आज, उद्या चार तासांसाठी बंद, १४ एप्रिल रोजीही कलम १४४ लागू , घरातच करा भीम जयंती….

औरंगाबाद शहर कार्यक्षेत्रात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून वैद्यकीय आस्थापना व सेवा वगळता सर्व प्रकारच्या आस्थापना 10 व 11 रोजी सायं. 7 ते रात्री 11 बंद राहतील, असे आदेश पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी निर्गमित केले आहेत. यापूर्वी त्यांनी दि . ९ आणि १० रोजीही असेच आदेश दिले होते. आज पुन्हा हे आदेश दिल्यामुळे आरामात खरेदीसाठी निघालेल्या लोकांना चांगलाच चोप बसला.
दरम्यान १४ एप्रिल रोजी डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनीही कोणीही रस्त्यावर येऊ नये म्हणून १४४ कलम लावण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे . कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खुलताबाद तालुक्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त 14 एप्रिल रोजी कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी उत्सव, मिरवणूक करण्यात येऊ नयेत. तसेच गर्दी करण्यात येऊ नये. आपापल्या घरातच जयंती साजरी करावी, असे आवाहन तालुका आपत्ती निवारण समितीचे अध्यक्ष तथा तहसीलदार राहुल गायकवाड यांनी केले आहे. प्रशासनामार्फत 144 कलम लागू करण्यात आले आहे. शासनाच्या आदेशाचे उल्लंघन केल्यास आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येईल. तरी नागरिकांनी प्रशास नास सहकार्य करावे, असेही श्री. गायकवाड यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.