#CoronaVirusUpdate : गेल्या २४ तासांत ७७३ नवीन रुग्ण आणि ३२ जणांचा मृत्यू , घरात राहा , सुरक्षित राहा…

Till date total 402 people have been discharged, total 5194 positive confirmed case have been reported. In last one day 773 positive cases were reported. Total 149 deaths have been reported and around 32 people have died yesterday: Lav Aggarwal,Joint Secy,Health Ministry #COVID19 pic.twitter.com/JUaLNCT270
— ANI (@ANI) April 8, 2020
देशातील करोना रुग्णांची संख्या पाच हजारांवर गेली आहे. गेल्या २४ तासांत देशात ७७३ नवीन रुग्णांची वाढ झाल्याने रुग्णांची एकूण संख्या ५,१९४ इतकी झाली आहे. रुग्णांप्रमाणेच मृतांची संख्याही वाढत आहेत. गेल्या २४ तासांत करोनाच्या ३२ जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे देशातील मृतांची एकूण संख्याही १४९ इतकी झाली आहे. तर ४०२ जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी दिली. हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन औषधाचा देशात तुटवडा नाही पण हे औषध सरसकट सर्वांना दिलं जात नाही. डॉक्टरांनी सांगितल्यावरच ते देण्यात येत आहे. कारण औषधकांचे साइड इफेक्टही रुग्णांवर होऊ शकतात. यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कुणीही औषध घेऊ नये. सध्या देशात हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनचा पुरेसा साठा आहे. पुढील काळासाठीही कमतरता भासू देणार नाही, असा विश्वास अग्रवाल यांनी व्यक्त केला. देशात आतापर्यंत करोनाच्या १,२१, २७१ चाचण्या करण्यात आल्याची माहिती आयसीएमआरचे डॉ. रमन गंगाखेडकर यांनी दिली.
कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी सर्व आघाड्यांवर प्रयत्न सुरू असले तरी, करोनाबाधितांचा आकडा दिवसागणिक वाढतच आहे. मुंबईसह राज्यभरात आज ११७ रुग्णांची नोंद झाली आहे. एकट्या मुंबईत ७२ जणांना करोनाचा संसर्ग झाल्याचं स्पष्ट झालं आहे. राज्यातील करोनाबाधितांची एकूण संख्या ११३५ वर पोहोचली आहे. राज्यात आज दिवसभरात ११७ जणांना करोनाचा संसर्ग झाल्याचं स्पष्ट झालं आहे. मुंबईतील करोनाबाधितांची संख्या सर्वाधिक आहे. ७२ जणांना करोनाची लागण झाली आहे. राज्यातील करोनाबाधितांचा आकडा आता ११३५वर पोहोचला आहे. तर आठ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळं मृतांचा आकडा आता ७२ वर पोहोचला आहे. मुंबईत आज दिवसभरात ७२ जणांना करोनाचा संसर्ग झाला आहे. नवी मुंबईत १, बुलडाणा १, पुणे ३६, अकोला १, ठाणे ३, कल्याण-डोंबिवली १, पुणे ग्रामीण २ अशा एकूण ११७ जणांना करोनाचा संसर्ग झाला आहे.
दरम्यान जे नोंदणीकृत बांधकाम मजूर आहेत त्यांना ३१ राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांनी आतापर्यंत १००० ते ६००० रुपये रोख रक्कम मदत म्हणून जाहीर केली आहे. २ कोटी नोंदणीकृत बांधकाम मजूरांना आतापर्यंत सरकारकडून ३००० कोटींची मदत दिली गेली आहेत, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्रालयाच्या संयुक्त सचिव पी.एस. श्रीवास्तव यांनी दिली.