#CoronaVirusEffect : मोदींच्या आवाहनामुळे देशभर पेटले कोट्यवधी दिवे ….

Delhi: PM Narendra Modi lights a lamp after turning off all lights at his residence. India switched off all the lights for 9 minutes at 9 PM today & just lit a candle, 'diya', or flashlight, to mark India's fight against #Coronavirus as per his appeal. pic.twitter.com/apLIVmMCTf
— ANI (@ANI) April 5, 2020
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्य आवाहनानुसार देशभरातीळ लोकांनीच नव्हे तर विदेशातील नागरिकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद देत कोट्यवधी दिवे लावले . कोरोनाविरोधात लढण्यासाठी रविवारी ९ वाजून ९ मिनिटांला दिवा पेटवून देशातील जनतेने राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला आहे. दिव्यांच्या प्रकाशात यावेळी संपूर्ण आसमंत उजळून निघाला आहे. नरेंद्र मोदी यांनी स्वत: घरातील लाईट ऑफ करुन दीपक लावले. एवढेच नाही तर त्यांच्या मातोश्री हीराबेन यांनीही दीपक पेटवून कोरोनाशी दोन हात करणाऱ्या देशवासीयांचा आत्मविश्वास वाढवला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिवे लावण्याच्या केलेल्या आवाहनाला नवी मुंबईत देखील चांगला प्रतिसाद पहायला मिळाला. नवी मुंबईत सिडको एक्सिबिशन सेंटर मध्ये उभारण्यात आलेल्या निवारा केंद्रातील नागरिकांनी देखील मेणबत्ती, फ्लॅश लाईट लावून या आवाहनाला प्रतिसाद दिला. या निवारा केंद्रात २४० नागरिकांना ठेवण्यात आले असून त्यांनी देखील आपण एक असून कोरोनाविरुद्ध सर्व मिळून ताकदीने लढण्याचा संदेश दिला. यावेळी नागरिकांनी टाळ्या देखील वाजवत पंतप्रधानांच्या या आवाहनाला प्रतिसाद दिला.
दरम्यान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला अनुसरून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी रविवारी रात्री ठीक ९ वाजता राजभवन, मुंबई येथे विद्युत दिवे बंद करून तसेच पारंपरिक दीप प्रज्वलीत करून करोनाच्या गंभीर आव्हानाला तोंड देण्यास देश एकत्र आहे हा संदेश दिला. दरम्यान, संपूर्ण देशासमोर कोरोना व्हायरसचं संकट आहे. देशात ३,५०० जणांना कोरोनाची लागण झाली आहे तर ८३ जणांचा या रोगानं बळी घेतला आहे. तर जगभरात ११ लाखांहून जास्त नागरिकांना या जीवघेण्या विषाणूची बाधा झाली आहे.