#CoronaVirusUpdate : गेल्या २४ तासात देशातील रुग्णांची संख्या ३ हजारपार , ७५ मृत्यू , २१३ जण सुखरूप घरी

देशभरातील कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या आज एका दिवसात तब्बल ५२५ ने वाढली आहे. आतापर्यंतची एका दिवसातील ही सर्वात मोठी वाढ आहे. यामुळे देशातील करोना रुग्णांची एकूण संख्या ३०७२ वर पोहोचली आहे. तर एकूण ७५ जणांना देशात करोनाने आतापर्यंत मृत्यू झाला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. देशात करोनाच्या २७८४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर २१३ जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं आहे. आरोग्य मंत्रालयाने रात्री ८ वाजता गेल्या २४ तासांची दिलेली ही आकडेवारी आहे.
दरम्यान केंद्रीय आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार एकूण कोरोनाग्रस्त रुग्णांपैकी ३० टक्के रुग्ण तबलिगी जमातीशी संबंधित असल्याचे सांगण्यात आले आहे म्हणजेच या देशातील ३०७२ पैकी १०२३ रुग्ण तबलिगी जमातीशी संबंधित असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. शनिवारी तबलिगी जमातीचे १७ रुग्ण सापडले असून त्यांची संख्या १०२३ झाली आहे देशातील रुग्णांपैकी ३० टक्के रुग्ण तब्लिघी जमातीची संबंधित आहेत अशी माहिती आरोग्य मंत्रालय एजंट सेक्रेटरी लव अग्रवाल यांनी दिली आहे. गेल्या चोवीस तासात रुग्णांचा आकडा अचानक वाढला असून ६०१ नवीन रुग्ण सापडले आहेत तर बारा रुग्णांचा मृत्यू झाला असून एकूण मृतांचा आकडा ६८ झाला आहे १८३ रुग्णांवर यशस्वी उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तबलिगी जमात च्या संपर्कात असलेल्या २२ हजार लोकांना क्वारंटाईन करण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले. तामिळनाडूतील रुग्णांची संख्या ४८५ वर पोहोचली आहे. यातील ४२२ करोना पॉझिटिव्ह रुग्ण हे एकाच भागात आढळून आलेत आहे. तामिळनाडूत आज ७४ करोनाचे नवे रुग्ण आढळले. यापैकी ७३ रुग्ण दिल्लीच्या निझामुद्दीनमधील तबलीघी जमातच्या मरकझशी संबंधित आहेत, अशी माहिती तामिळनाडूच्या आरोग्य सचिव बीला राजेश यांनी दिली.
निझामुद्दीनच्या तबलीगी जमात मरकझमधील २३०० जणांना आणलं गेलं आहे. यात ५०० जणांमध्ये करोनाची लक्षणं आढळून आल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. तर १८०० जणांना क्वारंटाइन केलं गेलं आहे. आम्ही सर्वांचं करोना चाचणी करून घेत आहोत. त्याचे रिपोर्ट दोन ते तीन दिवसांत येतील, अशी माहिती दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिली. दिल्लीत सध्या ४४५ करोना पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. यापैकी फक्त ४० जणांना स्थानिक संसर्गातून लागण झाली आहे. उर्वरीत जण हे विदेशी आहेत आणि निझामुद्दीनच्या मरकझमध्ये आहेत, असं केजरीवाल म्हणाले. दिल्लीतील करोनाचा प्रादुर्भाव थांबला असून नियंत्रणात आहे, असा दावा केजरीवाल यांनी केला आहे.