#CoronaVirusUpdate : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला केले दिवे लावण्याचे आवाहन ….

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी रात्री ९ वाजता ९ मिनिटे आपल्या दरवाजात किंवा बालकणीध्ये दिवे लावण्याचं आवाहन केले आहे. या प्रकाशून आपल्याला कोरोनाशी लढण्याचे बळ मिळेल. आणि देशाची एकता आणि शक्तीचा जागर होईल असा संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे. पण यावेळी घरातील सर्व लाईट्स बंद करा आणि आपली एकता दाखवा असं मोदी म्हणाले.
पंतप्रधान पुढे म्हणाले की, भारताने दाखवलेलं धैर्य अनेक देशांसाठी आदर्श आहे. लॉकडाऊनच्या काळात नागरिकांनी मोठं सहाकार्य केलं. हा सरकार आणि लोकांचा सामूहिक लढा आहे. तुम्ही कोणीही एकटे नसून आपण सगळे एकत्र आहोत. जनतेने २२ मार्चला जनता कर्फ्यूचं पालन केलं. त्यासाठीही मोदींनी पुन्हा एकदा जनतेचे आभार मानले आहेत.
जनतेला उद्धेशून मोदींनी आवाहन केले कि , ‘ डॉ. ५ एप्रिलला सगळ्यांनी कोरोनावर मात करण्यासाठी एकत्र यायचं आहे. १३० करोड देशवासियांच्या शक्तीचं प्रदर्शन करायचं आहे. मला रात्री ९ वाजता सगळ्यांचे ९ मिनिट हवं आहेत. यावेळी आपण घरातील सगळ्या लाईट बंद करू आणि सगळे घराच्या दारात उभे राहून मेनबत्ती, दिवा, मोबाईलची लाईट लावू. या वेळी घरातील सर्व लाईट बंद असतील. तेव्हा प्रकाशाच्या या महाशक्तीचा जागर होईल आणि सगळ्यांची एकता दिसेल’ असं आवाहन मोदींनी जनतेला केलं आहे