#Controversy : चर्चेतली बातमी : मोदींच्या दिवे लावणीवर काँग्रेस नेत्यांची टीका….”दिवा हा एखाद्या उद्देशासाठी पेटवा, अंधश्रद्धेसाठी नाही.”

On April 5, at 9 pm, light Diya, candle for 9 minutes to mark fight against coronavirus: Modi
Read @ANI Story | https://t.co/NTYxNUl8DC pic.twitter.com/NHcGrQTG2H
— ANI Digital (@ani_digital) April 3, 2020
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येत्या रविवारी ५ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता ९ मिनिटे दिवे जाळून सामूहिक शक्ती दाखवा असे आवाहन एका व्हिडिओ संदेशाद्वारे करोनाशी लढणाऱ्या देशातील जनतेला केले आहे. मात्र, यावर आता राजकीय प्रतिक्रिया उमटू लागण्या आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनीही आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आम्ही दिवे तर लावून, मात्र तुम्ही साथीच्या आजाराचे तज्ज्ञ आणि अर्थतज्ज्ञ काय म्हणतात ते ऐकावे, अशा शब्दांत भावनात्मक आवाहन करणाऱ्या पंतप्रधान मोदींना चिदंबरम यांनी प्रतिआवाहन केले आहे.
याबाबत ट्विट करताना चिदंबरम यांनी म्हटले आहे कि , तुम्ही आज गरिबांसाठी एका पॅकेजची घोषणा कराल. ते करण्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करताना विसरल्या आहेत. प्रतिकवाद महत्त्वाचा आहे, मात्र विचार आणि उपायांसाठी गंभीर विचार देखील तितकाच महत्त्वाचा आहे, असा टोलाही पी. चिदंबरम यांनी पंतप्रधान मोदी यांना लगावला आहे. पी. चिदंबरम यांच्या व्यतिरिक्त काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनीही पंतप्रधानांवर टीकास्त्र सोडले. आज देशाने पुन्हा प्रधान शोमॅनना ऐकले असे थरूर म्हणाले. त्यांनी लोकांची दु:ख आर्थिक संकटाबाबत काहीही म्हटले नाही. भविष्यासाठी काय योजना आहेत, तसेच लॉकडाऊननंतर काय होईल, अशा मुद्द्यांवर काहीही म्हटले नाही. फक्त एक फिलगुड स्थिती निर्माण केली, असे थरूर म्हणाले.
दरम्यान काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनीही पंतप्रधानांच्या भाषणावर प्रश्न उपस्थित केले आहेत. ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, ‘विषाणूचा प्रसार रोखणे, तपासणी किट्स, गरिबांना जेवण पोहोचविणे, गरिब-मजुरांना आर्थिक मदत करणे अशा मुद्द्यांवर काहीही ऐकायला मिळाले नाही. दिवा हा एखाद्या उद्देशासाठी पेटवा, अंधश्रद्धेसाठी नाही.’