#CoronaVirusEffect : लष्कराच्या नावानेही अफवा , लॉकडाऊनच्या वाढत्या कालावधीबद्दल होत आहेत असे खुलासे…

FAKE NEWS ALERT 🚨
PBNS got in touch with the Cabinet Secretary on this news article.
The Cabinet Secretary expressed surprise & said that there is no such plan of extending the lockdown. https://t.co/CrLlp6f7X5
— PB-SHABD (@PBSHABD) March 30, 2020
राज्यात आणि देशभरातच नव्हे तर जगभरात करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन सुरु असून यावरून सर्वत्र अफवाही मोठ्या प्रमाणात पसरवल्या जात असून नागरिकांनी कोणत्याही अफ़वावांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विशेष करून करोनामुळे सुरु असलेल्या लॉकडाऊन संदर्भात अनेक वेगवेगळ्या अफवा सोशल मीडियाद्वारे व्हायरल होत असताना दिसत आहेत. यातलीच एक अफवा म्हणजे ‘एप्रिल महिन्यात देशात आणीबाणी लागू करून लष्कराला रस्त्यावर उतरवण्यात येणार आहे’. या अफवेवर प्रत्यूत्तर देण्यासाठी खुद्द लष्करालाच समोर यावे लागले आहे. करोना व्हायरसचा धोका आणि देशव्यापी लॉकडाऊन अतिशय कठिण अशा परिस्थितीत सेनेनंच समोर येऊन या अफवेचे खंडन केले आहे.
या बाबत केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे कि , ‘एप्रिल महिन्यात देशात आणीबाणीची परिस्थिती जाहीर होऊ शकते, असा खोटा आणि चुकीचा संदेश सोशल मीडियाद्वार देशात पसरवला जात आहे. यामध्ये सेना, माजी सैनिक, एनसीसी आणि एनएसएसच्या मदतीनं ही आणीबाणी लागू केली जाईल, असाही उल्लेख आहे. ही केवळ अफवा आहे’ असं लष्करानं ट्विट केलंय. या अगोदर, लॉकडाऊनचा कालावधी वाढू शकतो, अशा आशयाच्या अफवांवर सरकारनं स्पष्टीकरण दिलंय. सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचे हे दावे खोटे असून लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्याची कोणतीही योजना नसल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. या आधीही भारतीय लष्कराला सामूहिक अंत्यसंस्काराची ट्रेनिंग दिली जात असल्याचा एक संदेश व्हायरल होताना दिसला होता. यामध्ये, करोना व्हायरसमुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या अगणित असेल आणि याचा सरकारला अंदाज आहे. म्हणूनच लष्कराला सामूहिक अंत्यसंस्काराचं ट्रेनिंग दिलं जात असल्याचा दावा करण्यात आला होता. यावरदेखील लष्करानं स्पष्टीकरण दिलं होतं. उल्लेखनीय म्हणजे, करोना फैलावाच्या पार्श्वभूमीवर सरकारने अफवा पसरवणाऱ्यांविरोधात कडक कारवाईची भूमिका घेतली आहे. तुम्हीही तुमच्याकडे एखादा मॅसेज आल्यानंतर तो पुढे पाठवण्याअगोदर त्याची नक्कीच खात्री करून घ्या.
I’m surprised to see such reports, there is no such plan of extending the lockdown: Cabinet Secretary Rajiv Gauba on reports of extending #CoronavirusLockdown (file pic) pic.twitter.com/xYuoZkgM5e
— ANI (@ANI) March 30, 2020
दरम्यान करोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात सुरु केलेल्या लॉकडाऊनचा आज सहावा दिवस आहे. करोना रुग्णांची दिवसेंदिवस वाढत जाणारी संख्या लक्षात घेता लॉकडाऊनचा कालावधी आणखी काही दिवसांसाठी किंवा महिन्यांसाठी वाढणार का? हा प्रश्न अनेकांना सतावतोय. जनतेच्या मनातील याच प्रश्नाचं उत्तर नकारार्थी देत केंद्र सरकारनं सामान्यांना दिलासा दिलाय. करोना व्हायरसच्या कारणानं लागू करण्यात आलेला २१ दिवसांचा लॉकडाऊन आणखी वाढवण्याची कोणतीही योजना नाही, असं सध्या तरी केंद्र सरकारनं स्पष्ट केलंय. कॅबिनेट सेक्रेटरी राजीव गौबा यांनी, लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्याबद्दल सरकारची योजना नसल्याचं सांगितलंय. याउलट अशा प्रकारच्या बातम्या आणि रिपोर्ट पाहून आपल्याला आश्चर्याचा धक्का बसल्याचं गौबा यांनी म्हटले आहे.