अफवांपासून सावधान , ते २९ एप्रिलला जगाचा विनाश वगैरे सगळं काही खोटं आहे …नासाच्या नावाचा गैरवापर !!

सध्या कोरोनाच्या भीतीने जग घाबरलेले असताना काही समाजकंटक लोकांना घाबरवणारे अनेक व्हिडीओ , क्लिप टाकून अफवा पसरविण्याचे काम करीत आहेत. कोरोनामुळे दिवसेंदिवत मृतांच्या संख्येत वाढ होत आहे. या सगळ्यात आणखी एक खगोलशास्त्रीय घटनेने लोक घाबरले आहेत. सोशल मीडियावर असे अनेक रिपोर्ट्स येत आहेत, ज्यात असा दावा केला जात आहे की, २९ एप्रिलपर्यंत जगाचा विनाश होणार आहे. या बातम्यांचे काही व्हिडीओही व्हायरल होत आहेत. मात्र, या सगळ्या अफवा असल्याचे समोर आले आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या बातम्या खोट्या आहेत. त्यामुळे तुम्हीही यावर विश्वास ठेवण्याआधी त्याची सत्यता पडताळून घ्या. तसेच, तुम्ही असे मेसेज कोणालाही फॉरवर्ड करू नका, यामुळं समाजात अशांतता पसरू शकते.
अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासाने काही दिवसांपूर्वी असा खुलासा केला होता की, एक उल्का किंवा लघूग्रह वेगाने पृथ्वीच्या दिशेनं येत आहे. असंही सांगितलं जात आहे की, हा लघूग्रह पृथ्वीवरील सर्वात उंच असलेल्या माउंट एव्हरेस्ट शिखराहूनही मोठा आहे. या उल्केचा वेग हा ३१३१९ किलोमिटर प्रतितास इतका आहे. म्हणजे जवळपास ८.७२ किलोमीटर प्रति सेंकद या वेगाने येत आहे. अर्थात, २९ एप्रिल रोजी, एक प्रचंड उल्का पृथ्वीच्या दिशेने येणार आहे. नासाच्या मते, सुमारे २ हजार फूट क्षेत्रासह जेओ २५ नावाचे एक उल्का भूमीपासून १.८ दशलक्ष किमी अंतरावर जाईल. गेल्या ४०० वर्षात किंवा येत्या ५०० वर्षात इतक्या जवळून कोणताच उल्का गेला नाही आहे. नासाने असेही म्हटले आहे की, हा उल्का चंद्रापासून पृथ्वीपर्यंतचे अंतर ४ पट जास्त वाढेल. मात्र या हा उल्का पृथ्वीला स्पर्श करणार नाही आहे. २०१३ मध्ये जवळपास २० मिटर रूंद अशी एक उल्का पृथ्वीच्या कक्षेत आदळली होती. तर एक ४० मिटरची उल्का १९०८ मध्ये सायबेरियाच्या कक्षेत आदळली होती. या उल्कापासून पृथ्वीवर कोणताही धोका असणार नाही. त्यामुळे, या अफवांवर विश्वास ठेवू नका.