#CoronaVirusUpdate : राज्यात १५९ तर देशात ८७३ कोरोनाग्रस्त , लॉकडाऊनचा चौथा दिवस …

करोनाशी संबंधित माहितीसाठी हेल्पलाइन +91-11-23978046
संपूर्ण देशभरात संपूर्ण लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतरचा आजचा चौथा दिवस असून देशातील आणि राज्यातील करोनाग्रस्तांचा रुग्णांचा आकडा थांबताना दिसत नाही. राज्यात आज पुन्हा सहा नवे रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी मुंबईत पाच आणि नागपूरमध्ये एक रुग्ण आढळल्याने राज्यातील करोना रुग्णांची संख्या १५९ वर गेली असून करोनामुळे ५ जणांचा मृत्यू झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे एका दीड वर्षाच्या मुलीलाही करोनाची लागण झाल्याचं आढळून आलं आहे. तर काल हिंदुजा रुग्णालयात एका ८२ वर्षीय डॉक्टरचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. काल राज्यात एकूण १७ नवे रुग्ण आढळून आले होते. त्यात सांगलीतील १२ जणांचा समावेश होता, तर नागपूरमधील ५ जणांचा समावेश होता.
149 new #Coronavirus positive cases have been reported in last 24 hours, total positive cases in India now stand at 873. https://t.co/1XkxnoDWTj
— ANI (@ANI) March 28, 2020
दरम्यान, देशभरात करोनाचे १९ नवे रुग्ण आढळल्याने देशातील करोना रुग्णांची संख्या ८७३ वर पोहोचली असून देशात आतापर्यंत १९ जणांचा मृत्यू झाला आहे. संपूर्ण देशातच करोनाचे रुग्ण वाढत चालल्याने आरोग्य यंत्रणेसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. पंजाबमध्ये आणखी ५ नवे रुग्ण आढळले, रुग्णांची संख्या ३८ वर गेली आहे. राजस्थानात करोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या ५२ वर गेली आहे. भोपाळमध्ये शासनाच्या आदेशाचे उल्लंघन करत कमलनाथ यांच्या पत्रकार परिषदेला हजर राहिलेल्या पत्रकारावर एफआयआर दाखल, या पत्रकाराला करोनाची लागण झाल्याचे उघडकीस आले आहे. करोनाशी संबंधित माहितीसाठी +91-11-23978046 या हेल्पलाइन फोन नंबरवर तुम्ही फोन करू शकता.