#CoronaVirusEffect : शिधापत्रिका धारकांना तीन महिन्यांचे नियोजित धान्य एकत्रित देण्याचे आदेश

औरंगाबाद – जिल्ह्यातील अाठ तालुक्यात माहे एप्रिल ते जून या काळातील जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा रास्त दरात नागरिकांना पर्यंत पोहोचवला जाईल याची काळजी संबंधित तहसिलदारांनी घेण्याचे आदेश जिल्हाधिकार्यांनी दिल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी महादेव किरवाळे दिली.
औरंगाबाद, पैठण,फुलंब्री, वैजापूर, गंगापुर, कन्नड, खुलताबाद, सिल्लोड आणि सोयगाव यैथील तहसिलदारांना कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने तालुक्यातील व शहरातील जनतेस जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा सुरळितपणे होण्यासाठी रास्त भाव दुकानदारांनी सकाळी आठ ते बारा व दुपारी ४ते ८ या वेळेत दुकान उघडे ठेवून गहू, तांदूळ, साखर, इत्यादींचा साठा कार्डधारकांना शासकिय दरात उपलब्ध करुन देण्यात यावा असै आदेश जारी करण्यात आले आहेत.ग्राहकांची कोणत्याही प्रकारची तक्रार शासनाकडे येणार नाही याची काळजी घ्यावी.तसैच आवश्यक ठिकाणी किराणा सामान घरपोच देण्यासाठी दुकानदारांना उद्युक्त करावे असेही आदेशात म्हटले आहे